विरुधुनगरमधील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; आठ ठार, तीन जखमी

शनिवारी झालेल्या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात आणखी तीन जण जखमी झाले आहेत.

    दिल्लीतील अलिपूर येथे शुक्रवारी एका पेंट फॅक्टरीला आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत किमान 11 जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता तामिळनाडूमधुन मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूतील (Tamil Nadu:) विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

    तामिळनाडूतील विरुधुनगर येथील फटाक्यांच्या कारखान्यात शनिवारी झालेल्या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात आणखी तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. प्राथमिक तपासानुसार मृतांमध्ये महिलांचाही समावेश आहे. सध्या स्फोटाचं कारण समजू शकलेलं नाही.