coronavirus next 48 hours will be critical for donald trump

    अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. काही दिवसापुर्वी कोलोरॅडो राज्याकडून (Colorado) त्यांच्यावर निवडणूक लढण्यावर बंदी घालण्यात आली होती. आता मेन (Maine) राज्यानेही ट्रम्प यांना पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी त्यांना अपात्र घोषित केले आहे. ट्रम्प यांना 6 जानेवारी 2021 रोजी झालेल्या दंगली प्रकरणी सुनावण्यात आली होती. त्याच्याच परिणाम त्यांच्या राजकीय कारकीर्दीवर होताना दिसत आहे.

    नेमंक काय प्रकरण

    सुमारे तीन वर्षांपूर्वी 6 जानेवारी 2021 रोजी यूएस कॅपिटलवर झालेल्या हल्ल्यातील त्यांची कथित भूमिका आहे. याप्रकरणी सुनावणी सुरु असताना कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अध्यक्षपदासाठी अपात्र घोषित केले होते. आता गुरुवारी, मेन राज्याच्या वरिष्ठ निवडणूक अधिकाऱ्याने माजी अध्यक्षांना आगामी निवडणुकीसाठी राज्याच्या प्राथमिक मतपत्रिकेतून अपात्र ठरवले आहे. ट्रम्प यांना २०२४ च्या राज्य मतपत्रिकेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.

    आता पुढे काय?

    बेलोवच्या निर्णयाला राज्य न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते, असे अहवालात म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची कायदेशीर टीम या प्रकरणी अपील करू शकते, ज्याची तयारी सुरू आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही जाऊ शकते. हे प्रकरण देशासाठी उदाहरण ठरू शकते, असे अनेक कायदेतज्ज्ञांचे मत आहे. यापूर्वी 6 जानेवारी 2021 रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही चुकीच्या कृत्यासाठी दोषी नसल्याची कबुली दिली होती. तर ट्रम्प यांनी संविधानाचा अवमान केल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. आताच्या निर्णयामुळे कोलोरॅडो राज्यावर ट्रम्प यांच्या विरोधातील विरोधकांचा दावा मजबूत होईल.