फोटो सौजन्य - सोशल मीडिया
trump visa policies 2026 : इंटरनॅशनल एज्युकेशन ऑर्गनायझेशन ‘NAFSA’ सह अनेक शैक्षणिक गटांनी केलेल्या अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अहवालानुसार, अमेरिकन कॉलेजांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशात गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी २०% घट झाली आहे. १४९ अमेरिकन कॉलेजच्या सर्वेक्षणावर आधारित ही आकडेवारी सांगते की, ट्रम्प सरकारच्या कडक व्हिसा नियमांमुळे आणि धोरणात्मक बदलामुळे ही घट झाली आहे.
अहवालानुसार, ६२% कॉलेजचे म्हणणे आहे की, २०२५च्या तुलनेत यावर्षी बॅचलर आणि मास्टर दोन्ही स्तरावरचे कमी प्रवेश झाले आहेत. परदेशी विद्यार्थी हे अमेरिकेच्या विदयापीठांच्या उत्पन्नाचे स्त्रोत आहेत. कारण ते जास्त टयूशन फी देतात जर त्यांची संख्या कमी झाली तर कॉलेजची अर्थिक स्थिती बिघडू शकते. ८४% शैक्षणिक संस्थानी या घटीसाठी थेट सरकारी धोरणांना जबाबदार धरले आहे.
NEET Success Story: कुरियर बॉयच्या मुलाने सलग ५ वेळा अपयशी ठरूनही कसे मिळवले ‘नीट’मध्ये यश?






