पणजी: सध्याच्या घडीला गोव्यामध्ये (Goa) काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. (Goa Assembly Election Results 2022) ४० जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी २२ जागा आवश्यक आहेत. परंतु, सध्या काँग्रेस आणि भाजप पक्ष १५ जागांच्या आसपास घुटमळत आहेत. क्षणाक्षणाला हे कल बदलत आहेत. यामध्ये दोन्ही पक्ष आळीपाळीने आघाडी घेताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यादरम्यान भाजपला एक मोठा धक्का बसला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे साखळी मतदारसंघातील लढतीत पिछाडीवर पडले आहेत. तर भाजपला सोडचिठ्ठी देऊन पणजीतून अपक्ष उभे राहणारे उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) हेदेखील पिछाडीवर आहेत.
[read_also content=”सरकार दरबारी सत्ता मिळावी म्हणून देवाच्या दरबारात साकडं, मतमोजणी आधी मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारांचं टेम्पल रन https://www.navarashtra.com/election-results-2022/election-results-2022/chief-minister-candidates-of-assembly-election-2022-visited-temples-nrsr-252357.html”]
पणजीत भाजपचे बाबुश मोन्सेरात हे आघाडीवर आहेत. त्यामुळे उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा धक्का बसण्याची शक्यता आहे. अद्याप संपूर्ण निकाल यायला बराच वेळ बाकी आहे. त्यामुळे ही परिस्थिती बदलूही शकते. तर गोव्यातील निवडणुकीत नशीब आजमवणाऱ्या शिवसेनेचा एकही उमेदवारी सध्या तरी विजयी होण्याच्या स्थितीत दिसत नाही. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप १६, काँग्रेस १५ जागांवर आघाडीवर आहे. तर मगोप-तृणमूल काँग्रेस आघाडी सात जागांवर आघाडीवर आहे.