फोटो सौजन्य: @Kawasaki_JPN (X.com)
पूर्वी बाईक खरेदी करताना अनेक जण तिच्या मायलेज आणि किमतीवर जास्त लक्षकेंद्रित करायचे. पण आज ही स्थिती बदलली आहे. आजच्या ग्राहकाला विशेषकरून तरुणाला वाटते की आपली बाईक फक्त उत्तम मायलेज देणारी नाही तर उत्तम लूक असणारी सुद्धा हवी. यातच आता अनेक जणांमध्ये स्पोर्ट बाइकची देखील क्रेझ पाहायला मिळत आहे.
देशात अनेक उत्तम स्पोर्ट बाइक उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे कावासाकी. कावासाकीने देशात जबरदस्त परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने देशात Kawasaki Ninja 650 चा स्पेशल एडिशन लाँच केला आहे.
तुमच्या रुबाबाला शोभेल अशा स्पेशल डार्क एडिशन लूकमध्ये येतात ‘या’ 5 SUV, किंमत फक्त…
कावासाकीने भारतीय बाजारात 2025 Kawasaki Ninja 650 KRT Edition लाँच केले आहे. भारतात ही बाईक 7,27,000 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. ही बाईक तिच्या आधीच्या व्हर्जनपेक्षा 11000 रुपयांनी जास्त महाग आहे. चला या नवीन बाइकच्या फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
2025 Kawasaki Ninja 650 KRT Edition मध्ये 649 सीसी लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन वापरले आहे. हे इंजिन 67.3 पीएस पॉवर आणि 64 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह 6-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. याशिवाय, त्यात तीन निवडक रायडिंग मोड देखील दिले आहेत.
या नवीन बाईकमध्ये 4.3 -इंचाचा टीएफटी कलर डिस्प्ले आहे, जो रायडरला सर्व आवश्यक माहिती देतो. याशिवाय, त्यात मोबाईल डिव्हाइससाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि ऑल-एलईडी लाइटिंग आहे. यात ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे. तसेच यामध्ये, ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम दोन मोडमध्ये उपलब्ध आहे. निसरड्या रस्त्यावर ही बाईक एकदम उत्तम रित्या चालते.
अजबच ! नेपाळमध्ये Royal Enfield ची ‘ही’ बाईक लाँच, मात्र किंमत भारतीय रुपयांपेक्षा जास्तच
2025 कावासाकी निन्जा 650 केआरटी एडिशन कँडी स्टील फर्नेस ऑरेंज/मेटलिक स्पार्क ब्लॅक मेटॅलिक रॉयल पर्पल आणि मेटॅलिक मॅट ओल्ड स्कूल ग्रीन मेटॅलिक स्पार्क ब्लॅक रंगात येते. परंतु, हे रंग अद्याप भारतीय बाजारात लाँच झालेले नाहीत.