फोटो सौजन्य: @MyMotoringWorld/ X.com
भारतीय ऑटो बाजारात Kawasaki च्या बाईक्सना जोरदार मागणी आहे. कंपनी नेहमीच आपल्या दमदार बाईक्स आणि हाय परफॉर्मन्ससाठी ओळखली गेली आहे. तसेच, ग्राहकांना उत्तम राइड अनुभवता यावी यासाठी कंपनी नेहमीच नवनवीन बाईक्स लाँच करत असते. नुकतेच कावासाकीने 1,099 सीसीच्या 2 बाईक भारतीय बाजरात लाँच केल्या आहेत.
कावासाकीने त्यांच्या सुपरनेक्ड बाईक, 2026 Kawasaki Z1100 आणि Z1100 SE, भारतीय बाजारात लाँच केल्या आहेत. हे कंपनीचे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्प्लेसमेंट Z मॉडेल आहे. जे भारतात 12.79 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच केली गेली आहे. यात Z1000 पेक्षा मोठे इंजिन आहे, जे जास्त पॉवर आणि टॉर्क जनरेट करते.
या बाईकला Sugomi सारखा डिझाइन दिला गेला आहे. हे डिझाइन अत्यंत स्टायलिश आणि रस्त्यावर सादर करण्यायोग्य बनवते. याच्या शार्प लाइन्स, खोल कट ग्रूव्ह आणि मस्क्युलर स्टॅन्समुळे ती इतर बाईकपेक्षा वेगळी दिसते.
Kawasaki Z1100 मध्ये शार्प LED हेडलाइट, एग्रेसिव्ह फ्रंट फेशिया, आकर्षक रियर-व्ह्यू मिरर्स, मस्क्युलर आणि स्कल्प्टेड फ्युएल टँक, 4-into-1 एग्झॉस्ट सेटअप, अपस्वेप्ट एग्झॉस्ट टिप, स्पोर्टी पॉइंटेड टेल सेक्शन आणि स्कूप्ड रायडर सीट असे फीचर्स दिले आहेत.
हा मॉडेल फक्त Ebony / Metallic Carbon Gray या एका रंगात लाँच करण्यात आला आहे. तर Z1100 SE मॉडेल Metallic Matte Graphenesteel Gray / Metallic Matte Carbon Gray या ड्युअल-टोन रंगसंगतीत आणले आहे. डार्क थीममुळे या बाईकला अधिक बोल्ड आणि दमदार लुक मिळतो. इंजिन, फ्रेम आणि इतर बहुतांश भागांवर ब्लॅक-आउट ट्रीटमेंट दिली आहे.
सेकंड हँड CNG CAR खरेदी करताय? सावधान! ‘या’ ५ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होऊ शकतो मोठा धोका!
दोन्ही बाईक्सचे ओव्हरऑल लुक समान ठेवण्यात आला आहे. मात्र, Z1100 SE मध्ये दिलेले अलॉय व्हील्स Z1100 पेक्षा वेगळे आणि अधिक प्रीमियम दिसतात.
Kawasaki Z1100 ची किंमत 12.79 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. ही किंमत तुमच्याजवळील शोरुमनुसार बदलू शकते.






