नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील एसीबीची कारवाई हे भाजपचे षडयंत्र काँँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी आरोप केला (फोटो - सोशल मीडिया)
काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये लाचलुपचत प्रतिबंधक विभागाने केलेल्या मोहिमेवर देखील प्रतिक्रिया दिली. मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजेंद्र ढेरंग याने तक्रारदाराकडे 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यातील काही पैसे स्वीकारताना या लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यावर त्या म्हणाल्या की, ‘हे टक्केवारीचे सरकार आहे तर नरहरी झिळवाळ यांना बदनाम करण्याचे भाजपच षडयंत्र असू शकतं.’ अशी टीका ठाकूर यांनी केली.
हे देखील वाचा : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका
पुढे यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आता मंत्रालयामध्ये देखील याच गोष्टी चालू आहे. कुठल्याही ऑफिसमध्ये जा टक्केवारी टक्केवारीचा हिशोब आहे. आता ते उघड झालं आहे. प्रत्येक मंत्र्याच्या ऑफिसमध्ये टक्केवारी मागितली जाते. हे टक्केवारीचे सरकार हे आहे, अशी घणाघाती टीका यावेळी ठाकूर यांनी सरकारवर केली आहे.
हे देखील वाचा : “तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन…; ACB ने लिपीकाला रंगेहात पकडल्यानंतर नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया
यशोमती ठाकूर म्हणाल्या की, ‘भाजपाने देशाला विकलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःला विश्वगुरू समजतात पण साधी प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकत नाही. महिलांच्या आड लपण्याचा प्रयत्न मोदी करतात या देशाचं राजकीय वगळ वेगळ्या स्वरूपामध्ये जात आहे या गोष्टीचा निषेध आहे. एपस्टीन फाईलमध्ये भाजपचे मंत्री हरदीप पुरी यांचं नाव आढळले आहे. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही असा सवाल देखील यशोमती ठाकूर यांनी विचारला आहे.
नहरी झिरवाळ यांची पहिली प्रतिक्रिया
या प्रकरणावर अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.






