फोटो सौजन्य: iStock
हल्लीच्या कारमध्ये अनेक दमदार फीचर्स पाहायला मिळत आहे. असाच एक फिचर सनरूफचा आहे जो आता ग्राहकांना त्यांच्या नवीन कारमध्ये हवा आहे. पूर्वी सनरूफ हा फिचर फक्त लक्झरी कारमध्ये मिळायचा, पण आता हा फिचर मिड-रेंज आणि बजेट-फ्रेंडली कार्समध्येही पाहायला मिळतो. विशेषतः मिडल-क्लास ग्राहक या फिचरला जास्त पसंती देत आहेत. जर तुम्हीही 10 लाखांखालील बजेटमध्ये सनरूफ कार घेण्याचा विचार करत असाल, तर भारतातील अशा 5 किफायतशीर सनरूफ कार्सची माहिती खाली दिली आहे.
भारतामधील सर्वात स्वस्त सनरूफ कार म्हणजे Hyundai Exter. याचा S-Smart Variant Voice-enabled इलेक्ट्रिक सनरूफसह येतो आणि त्याची किंमत फक्त 7.68 लाख रुपये आहे. ही मायक्रो SUV 6 airbags, डॅशकॅम आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी सारख्या फिचर्सने सुसज्ज आहे. यात 1.2-लीटर पेट्रोल आणि CNG इंजिनचे पर्याय मिळतात. या कारचा पेट्रोल वर्जन 19.4 kmpl मायलेज देतो तर CNG वर्जन 27.1 km/kg मायलेज मिळतो.
Hyundai च्या नवीन इलेक्ट्रिक कारची पहिली झलक आली समोर, कधी होणार लाँच?
Tata Punch Adventure S variant सनरूफसह येतो आणि त्याची किंमत ₹7.71 लाख आहे. भारतामधील सर्वात सुरक्षित मायक्रो SUV मानली जाणारी ही कार 5-Star Safety Rating सह उपलब्ध आहे. यात 1.2-लीटर पेट्रोल आणि CNG इंजिनचे पर्याय आहेत. याचा पेट्रोल वर्जनचा मायलेज 18.8–20 kmpl आहे. या कारचा CNG वर्जनचा मायलेज 26.99 km/kg आहे. तसेच यात 360-डिग्री कॅमेरा, 7-इंच टचस्क्रीन आणि 6 airbags सारखे ॲडव्हान्स फिचर्स मिळतात.
Hyundai Venue E+ variant सनरूफसह येतो आणि त्याची किंमत 8.32 लाख आहे.यात 1.2-लीटर, 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन असून हा व्हेरिएंट सुमारे 18 kmpl मायलेज देतो. फिचर्समध्ये 6 airbags, ABS+EBD, रियर पार्किंग सेन्सर्स, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि सीटबेल्ट रिमाइंडर यांचा समावेश आहे.
Kia Sonet HTE (O) Variant सनरूफसह उपलब्ध असून त्याची किंमत ₹8.44 लाख आहे. ही SUV पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन पर्यायांमध्ये येते. यात Dual 10.25-इंच डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल आणि 6 airbags सारखे प्रीमियम फिचर्स मिळतात. ही कार विशेषतः बजेटमध्ये मॉडर्न SUV हवी असणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम आहे.
Hyundai i20 Sportz variant ग्लास सनरूफसह उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 8.76 लाख रुपयेआहे.
ही प्रीमियम हॅचबॅक तिच्या स्टायलिश डिझाईन आणि फीचर-रीच इंटिरियरसाठी ओळखली जाते. यात 10.25-इंच टचस्क्रीन, प्रीमियम साउंड सिस्टम आणि क्रूझ कंट्रोल असे फिचर्स मिळतात. Hyundai i20 पेट्रोल इंजिनसह उपलब्ध असून सुमारे 20 kmpl मायलेज देते.