फोटो सौजन्य: @Pathtoremember/X.com
भारतीय मार्केटसह जागतिक मार्केटमध्ये सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत मोठी वाढ होताना दिसत आहे. अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार रेंज आणि फीचर्स ऑफर करणाऱ्या इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. आता तर आघाडीची स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने सुद्धा ऑटोमोबाईल क्षेत्रात आपले पहिले पाऊल टाकले आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक कारला सुद्धा ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने जून 2025 मध्ये त्यांची दुसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही YU7 लाँच केली. ही कार लाँच होताच चीनमध्ये इतिहास रचला गेला आहे. या इलेक्ट्रिक कारच्या लाँचिंगच्या अवघ्या तीन मिनिटांतच कंपनीला 2 लाखांहून अधिक ऑर्डर मिळाल्या आहेत. पहिल्या तासातच हा आकडा सुमारे 2.9 लाख युनिट्सपर्यंत पोहोचला. Xiaomi YU7 बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया, ती कोणत्या खास फीचर्ससह आणली गेली आहे ज्यामुळे तिला इतका मोठा प्रतिसाद मिळाला.
ग्राहकांची आवडती Tata Punch खरेदी करण्यासाठी किती वर्ष भरावा लागेल EMI?
याचे डिझाइन SU7 सेडानशी मिळते जुळते आहे. यात आकर्षक कूप-स्टाईल प्रोफाइल, रुंद फ्रंट ग्रिल, आक्रमक एअर इंटेक्स आणि उतरणीच्या आकाराची रूफलाइन दिली आहे. मस्क्युलर लुकसह कनेक्टेड LED लाइट बार आणि एअरोडायनॅमिक डिझाईनमुळे याला स्पोर्टी तसेच प्रीमियम अपील मिळते. शाओमीने यामध्ये मोठे बूट स्पेस आणि फ्लश-फिटिंग डोर हँडल्स देखील दिले आहेत.
या इलेक्ट्रिक SUV च्या इंटीरियरमध्ये 1.1-मीटर रुंदीचा हायपरव्हिजन हेड्स-अप डिस्प्ले आणि 16.1-इंचाचा सेंट्रल टचस्क्रीन देण्यात आला आहे. ही स्क्रीन Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटवर कार्य करते. YU7 ही शाओमीच्या HyperOS वर चालते, जे स्मार्टफोन आणि स्मार्ट होम डिव्हाइससोबत उत्तम इंटिग्रेशनचे आश्वासन देते. यामध्ये ॲम्बियंट लाईटिंग, प्रीमियम अपहोल्स्ट्री, रिअर सीट प्रोजेक्टर आणि मल्टी-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टम यांसारखे आधुनिक फीचर्स देखील उपलब्ध आहेत.
इलेक्ट्रिक स्कूटरची सगळीकडेच चर्चा, मात्र TVS Orbiter आणि Bajaj Chetak 3001 मध्ये बेस्ट कोण?
ही तीन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे, जे स्टँडर्ड (RWD), प्रो (AWD) आणि मॅक्स (AWD) आहेत. यात BYD ची 96.3 kWh LFP बॅटरी आणि CATL ची 101 kWh NMC बॅटरीचा पर्याय आहे, ज्याची CLTC रेंज 760 किमी ते 835 किमी दरम्यान आहे.
याच्या Standard (RWD) variant ची रेंज 835 km आहे आणि हा 0-100 km/h वेग फक्त 5.9 सेकंदात गाठू शकतो. दुसरा Pro AWD variant ची रेंज 770 km असून तो 0-100 km/h स्पीड फक्त 3.2 सेकंदात पकडतो. तर तिसरा Max AWD variant देखील फक्त 3.2 सेकंदात 0-100 km/h वेग गाठण्यास सक्षम आहे.
Xiaomi ने YU7 ची किंमत RMB 253,500 (अंदाजे रु. 29.2 लाख) ठेवली आहे, जी चीनमधील टेस्ला मॉडेल Y पेक्षा खूपच स्वस्त आहे. जुलै 2025 मध्ये डिलिव्हरी सुरू झाली आणि Xiaomi ने पहिल्या महिन्यात 30,000 हून अधिक युनिट्स डिलिव्हर करण्याचा टप्पा आधीच पार केला आहे.