फोटो सौजन्य: iStock
मे चा महिना अजून उजाडायचा बाकी आहे आणि आताच एप्रिलमध्ये उन्हाचे जबरस्त चटके लागायला सुरुवात झाली आहे. अशा मोसमात आपण अनेकदा डिहायड्रेट होत असतो. त्यामुळे सतत पाणी पिणे आणि कलिंग टरबूज सारखे फळं खाल्ली पाहिजे.
उन्हाळ्यात तापमान झपाट्याने वाढते आहे, आणि या उष्णतेचा परिणाम केवळ आपल्या शरीरावरच नाही तर आपल्या वाहनांवरही होतो. त्यामुळे या हंगामात कारची योग्य देखभाल करणे अत्यंत गरजेचे ठरते. उष्णतेमुळे कारच्या इंजिनचे तापमान वाढू शकते, टायरचा प्रेशर कमी-जास्त होऊ शकतो आणि बॅटरीवरही ताण येतो. काही वेळेस तर कारला आग देखील लागू शकते.
जर Honda CB300R मध्ये दिसली ‘ही’ समस्या तर तात्काळ कंपनीला करा संपर्क, फुकटात होईल दुरुस्ती
खरंतर, दर उन्हाळ्यात तुम्ही कार्सना आग लागल्याच्या बातम्या वाचल्या किंवा ऐकल्या असतीलच. त्यामुळे आपल्या कारची काळजी घेणे खूप महत्वाचे बनते. म्हणूनच आज आपण उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या कारबाबत कोणत्या चुका टाळल्या पाहिजे त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
उन्हाळा येताच, अनेक लोक हिल स्टेशनवर जाण्याचे प्लॅनिंग करू लागतात आणि संधी मिळताच ते त्यांच्या कारने हे लांब अंतर कापण्यासाठी निघतात. या काळात, बरेच लोक न थांबता कार चालवत राहतात. याचा त्याच्या कारवर वाईट परिणाम होऊ शकतो. जर कार सतत चालत राहिली तर त्याचे इंजिन जास्त गरम होण्याचा धोका वाढतो. यामुळे, वाहन थांबण्याव्यतिरिक्त, जास्त गरमीमुळे आग लागण्याचा धोका देखील वाढतो.
अखेर ग्राहकांना समजली ‘या’ कंपनीची खरी किंमत ! 17 वर्षात पहिल्यांदाच अनुभवली रेकॉर्डब्रेक विक्री
अनेकांना असे वाटते की जर त्यांची कार चांगली चालली तर ते काही काळानंतर त्याची सर्व्हिसिंग करून घेतील. पण असे करून नयेत. जेव्हा कार सर्व्हिसिंगची योग्य वेळ येते तेव्हा तुम्ही विलंब न करता त्याची सर्व्हिसिंग करून घ्यावी. कारच्या सर्व्हिसिंगमध्ये तुम्हाला कारमधील समस्या आधीच कळतात, ज्या तुम्ही लगेच दुरुस्त करू शकतात.
ज्यांच्याकडे कार आहे त्यांनी उन्हाळ्यात त्यांच्या कारमधील कूलंटची पातळी पूर्ण ठेवावी. कारमध्ये कूलंटची कमतरता असल्यास त्याचा थेट परिणाम इंजिनवर होतो. कूलंट हे इंजिनला जास्त गरम होण्यापासून रोखते. कारमधील कूलंटचे प्रमाण कमी झाल्याने बऱ्याच प्रकरणांमध्ये, लोकांना इंजिन बदलावे लागले आहे. हे टाळण्यासाठी, उन्हाळ्याच्या हंगामात तुमच्या कारमधील कूलंटचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.