फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)
भारतात दुचाकी वाहनांची विक्री वाढताना दिसते. यातही इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटरला जबरदस्त मागणी मिळत आहे. याच वाढत्या मागणीकडे पाहून, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक ऑफर करत आहे. ग्राहक देखील मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरला भरघोस प्रतिसाद देत आहे. अशातच आज आपण अशा इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या विक्रीने Ola Electric ला सुद्धा मागे सोडले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Honda Gold Wing Tour चा 50वा अॅनिव्हर्सरी एडिशन लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
बजाज ऑटोसाठी, दर महिन्याला फक्त एकच मॉडेल असे आहे, जे त्यांचे जुने सर्व रेकॉर्ड मोडत आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट असलेली एकमेव इलेक्ट्रिक स्कूटर चेतक ईव्ही एप्रिलमध्ये सर्वात यशस्वी मॉडेल होती. गेल्या महिन्यात, त्यातील 19,216 युनिट्स विकले गेले. तर एका वर्षापूर्वी म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये, त्यातील 11,121 युनिट्स विकले गेले. अशाप्रकारे, एका वर्षाच्या अंतराने 8,095 युनिट्स जास्त विकले गेले. कंपनीच्या देशांतर्गत विक्रीत या स्कूटरचा मार्केट शेअर 72.79% वाढला, म्हणजेच 100 पैकी 10 ग्राहक ही स्कूटर खरेदी करत आहेत.
नवीन चेतक 35 सिरीज पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित आहे. त्यात 3.5 किलोवॅट क्षमतेचा मोठा अंडरफ्लोर बॅटरी पॅक समाविष्ट आहे. हे प्लेसमेंट स्कूटरचे वजन आणि हँडलिंग सुधारतेच, शिवाय 35 लिटर अंडर-सीट स्टोरेज देखील मोकळे करते. ज्यात तुम्ही त्यात हेल्मेटसह अनेक महत्त्वाच्या गोष्टी सहजपणे ठेवू शकाल.
नवीन बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम चांगले परफॉर्मन्स आणि एफिशियन्सी सुनिश्चित करते. कंपनीचा दावा आहे की ती एका चार्जवर 125 किमीची वास्तविक रेंज देईल. तर कंपनीने याच्या रेंजसाठी 153 किमीचा दावा केला आहे. 950 वॅट चार्जरमुळे ही स्कूटर फास्ट चार्ज होते. ज्यामुळे ती फक्त 3 तास 25 मिनिटांत 80% चार्ज होते.
Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स
बजाजच्या या नवीन सिरीजमध्ये लांब सीट आहे, जी अधिक आरामदायी राइड ऑफर करते. त्यात रिव्हर्स मोड देखील असेल ज्यामुळे पार्किंग सोपे होईल. या सिरीजमध्ये कलरफुल TFT डिस्प्ले आहे, ज्यामध्ये टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, कॉल कंट्रोल आणि म्युझिक मॅनेजमेंटची फीचर्स आहेत, जे स्मार्टफोनशी सहजपणे कनेक्ट होते. रायडर या स्कूटरमध्ये म्युझिक देखील नियंत्रित करू शकतात.
तुम्हाला त्याच्या डिस्प्लेवर थेट रिअल-टाइम नोटिफिकेशन देखील मिळतात. या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 73 किमी प्रतितास आहे. तो इको आणि स्पोर्ट्स मोडसह येतो. चेतक इलेक्ट्रिक पहिल्यांदा 2019 मध्ये लाँच करण्यात आली होती. नंतर, कंपनीने रायडरच्या गरजेनुसार ही स्कूटर अपडेट केली.