Honda Gold Wing Tour चा 50वा अॅनिव्हर्सरी एडिशन लाँच,
होंडाने देशात अनेक उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. यात कंपनीच्या बजेट फ्रेंडली बाईक आणि स्कूटरला विशेष मागणी असते. मात्र, याव्यतिरिक्त कंपनीने प्रीमियम सेगमेंटमध्ये देखील बाईक ऑफर केली आहे. Gold Wing Tour असे या बाईकचे नाव आहे. नुकतेच कंपनीने याचे नवीन एडिशन लाँच केले आहे. 50th Anniversary Edition या नावावरून या बाईकला लाँच करण्यात आले आहे. ही विशेष आवृत्ती होंडाच्या प्रीमियम बिगविंग टॉपलाइन डीलरशिप्समध्येच विक्रीसाठी उपलब्ध असेल. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
2025 Honda Gold Wing Tour 50th Anniversary Edition विशेषतः बोर्डो रेड मेटॅलिक रंगात देण्यात आली आहे, जे त्याला एक शाही आणि विशेष लूक देते. या लिमिटेड एडिशन मॉडेलमध्ये एक खास गोल्ड विंग बॅज आहे, ज्यावर “50 व्या वर्धापन दिन” आणि “Since 1975” अशी टॅगलाइन आहे.
फुल्ल चार्जवर 170 km ची रेंज देणाऱ्या Honda च्या इलेक्ट्रिक बाईकची सगळीकडेच चर्चा
होंडाने गोल्ड विंग टूरमध्ये उत्कृष्ट फीचर्स दिले आहेत, जसे की 7-इंच फुल-कलर TFT डिस्प्ले जो रायडिंग डेटा, नेव्हिगेशन आणि ऑडिओ माहिती दर्शवितो. या सेगमेंटमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले प्रथमच प्रदान केले गेले आहेत. अपग्रेड केलेले ऑडिओ सिस्टम हाय स्पीडमध्ये देखील स्पष्ट आवाज देते. याशिवाय, बाईकमध्ये इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल विंडस्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, दोन USB टाइप-सी पोर्ट, TPMS आणि ऑल-एलईडी लाइटिंग सारख्या फीचर्सचा समावेश आहे.
या बाईकमध्ये 1,833 सीसी 6-सिलेंडर इंजिन आहे, जे 7-स्पीड डीसीटी (ड्युअल क्लच ट्रान्समिशन) सह येते. हे इंजिन लांब टूरिंग राईड्ससाठी उत्तम आउटपुट देते. यात क्रूझ कंट्रोल, हीटेड ग्रिप्स आणि हिल स्टार्ट असिस्ट सारख्या फीचर्सचा समावेश आहे, ज्यामुळे ते एक परिपूर्ण टूरिंग मोटरसायकल बनते.
Jeep Cherokee चा होणार कमबॅक ! नव्या डिझाइनसह मिळणार महत्वाच्या प्रीमियम फीचर्स
2025 Honda Gold Wing Tour 50th Anniversary Edition च्या एक्स-शोरूम किंमत 39.50 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या बाईकची बुकिंग भारतातील निवडक बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर सुरू झाली आहे. याची डिलिव्हरी जून २०२५ पासून सुरू होईल. टूरिंग अनुभवाची आवड असलेल्या रायडर्ससाठी ही बाईक एक उत्तम पर्याय आहे.