Uranium Seizure Plan : ट्रम्प यांचा मास्टरस्ट्रोक! थेट इराणमध्ये घुसून युरेनियम जप्त करणार? अमेरिका-इस्रायलचे सीक्रेट मिशन तयार (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
Middle East War : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर
मीडिया रिपोर्टनुसार, मध्यपूर्वेतील युद्ध सध्या धोकादायक वळणावर आहे. दरम्यान अमेरिका (America) आणि इस्रायल (Israel) एक स्पेशल फोर्स तयार करत आहे. ही स्पेशल फोर्स थेट इराचणच्या भूमीत उतरून तेथील युरेनियमचा समृद्ध साठा ताब्यात घेणार आहे. यामुळे इराणला अण्वस्त्रे बनवता येणार नाहीत असे ट्रम्प-नेतन्याहूंचे म्हणणे आहेत.
अहवालानुसार, ट्रम्प प्रशासनाने इराणच्या अणु केंद्रांवर ताबा मिळवण्यासाठी सैन्य पाठवण्याची चर्चा केली आहे. याचा उद्देश इराणकडे असलेला ६०% पर्यंत संवर्धित ४५० किलो युरेनियमचा साठा जप्त करणे किंवा निकामी करणे आहे. अणु तज्ज्ञांच्या मते हा साठा ९०% पर्यंत असून त्यापासून किमान ११ अणूबॉम्ब तयार केले जाऊ शकतात. ट्रम्प यांच्या मते इतक्या मोठा प्रमाणाच अणु साठा इराणकडे असे अमेरिकेच्याच नव्हे तर जागासाठी देखील धोकादायक आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिका-इस्रालने ऑपरेशन एपिक फ्युरी सुरु केले होते. आता इराणचा युरेनियम साठा जप्त करण्याची देखील तयारी सुरु आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी स्पष्ट केले होते की, इराण(Iran) ला कधीही अण्वस्त्रे मिळवू दिली जाणार नाहीत. माध्यमांशी बोलताना त्यांनी सैन्य पाठवण्याचा प्लॅन सध्या नाकारला आहे. सध्या आम्ही युरेनियम जप्त करण्याचा प्रयत्न नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, केवळ युरेनियम साठाच नाही तर इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेला खर्ग आयलंड देखील ताब्यात घेण्याची शक्यता आहे.
US Iran War : अमेरिका- इराणमध्ये युद्धाचा भडका, हल्ले सुरुच; 52000 भारतीय मायदेशी परतले
Ans: इराणचा अणु कार्यक्रम थांबवण्यासाठी विशेष सैन्य पाठवून तेथील समृद्ध (60%) युरेनियम साठा ताब्यात घेण्याचा ट्रम्प-नेतन्याहू विचार करत आहेत.
Ans: 450 किलो 60% समृद्ध युरेनियम इराणकडे असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
Ans: हे युरेनियम काही आठवड्यांत 90% पर्यंत समृद्ध केले जाऊ शकते, ज्यापासून ११ अणु बॉम्ब सहज बनवता येतात






