फोटो सौजन्य: iStock
राज्यतील अनेक मोठ्या शहरांमध्ये वायूप्रदूषण झपाट्याने वाढताना दिसत आहे. हवेमध्ये असलेली धूळ, धूर आणि हानिकारक कण आपल्या फुफ्फुसांना गंभीर नुकसान पोहोचवू शकते. विशेष म्हणजे कारचे केबिन बंद असल्याने त्याच्या आतील प्रदूषण अधिक धोकादायक ठरते. अशा वेळी कार एअर प्यूरीफायर ही अतिशय उपयुक्त उपकरणे आहेत, जी कारमधील हवा स्वच्छ आणि शुद्ध ठेवतात. ARAI प्रमाणपत्र आणि यूजर रिव्ह्यूच्या आधारे आज आपण भारतातील 5 सर्वात परवडणारे आणि प्रभावी कार एअर प्यूरीफायरबद्दल जाणून घेऊया, जे किफायतशीर असून परिणामकारकही आहेत.
Philips GoPure Compact 110 हे कार एअर प्यूरीफायर सेगमेंटमधील सर्वात विश्वासार्ह मॉडेल्सपैकी एक आहे. यात H13 HEPA फिल्टर आणि ॲक्टिवेटेड कार्बन वापरण्यात आला आहे, जो हवेत असलेले 99.9% PM2.5 कण काढून टाकतो. स्मार्ट ऑटो मोडमुळे हे प्यूरीफायर हवेतल्या प्रदूषणानुसार फॅन स्पीड आपोआप बदलते. हलके, शांत आणि USB द्वारे चालणारे हे डिव्हाइस 4,000 ते 5,000 रुपयांच्या किमतीत एक उत्तम पर्याय ठरते.
Mahindra XEV 9S ची पहिली झलक सबसे अलग! ‘या’ दिवशी होणार लाँच, Tata Curvv ला मिळणार जोरदार टक्कर
जर तुम्ही Mahindra XUV700 सारखी मोठी SUV चालवत असाल, तर Honeywell Move Pure हे मॉडेल तुमच्यासाठी परफेक्ट आहे. यात 360° एअर इंटेक, H13 HEPA फिल्टर, आणि 99.97% फिल्ट्रेशन क्षमता दिली आहे. याचे CADR 70 m³/h असल्याने मोठ्या केबिनसाठी हे आदर्श ठरते. मोबाइल अॅप कनेक्टिव्हिटीद्वारे तुम्ही रिअल-टाइम AQI*पाहू शकता. त्यातील प्लाझ्मा आयनायझर हवेतल्या व्हायरस आणि बॅक्टेरिया निष्क्रिय करतो. याची किंमत 6,000 ते 7,500 रुपये असून मोठ्या कारसाठी हे उत्कृष्ट मानले जाते.
कमी बजेटमध्ये चांगला एअर प्युरिफायर हवा असेल, तर Qubo Smart Car Air Purifier हा एक चांगला पर्याय आहे. यात HEPA + कार्बन फिल्टर असून हवा 99% स्वच्छ करतो. Alexa आणि Google Assistant द्वारे हे डिव्हाइस कंट्रोल करता येते. ऑटो मोड हवा ओळखून आपोआप कार्यरत होतो. सोपी इंस्टॉलेशन आणि कमी मेंटेनन्समुळे यूजर्समध्ये हे मॉडेल लोकप्रिय आहे. याची किंमत 2,500 ते 3,500 रुपये आहे.
नवीन Hero Xtreme 160R लवकरच होणार लाँच? मिळणार धमाकेदार लूक
जर तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि स्टायलिश डिझाइन दोन्ही महत्त्वाचे वाटत असतील, तर Xiaomi Mi Car Air Purifier योग्य आहे. यात OLED डिस्प्ले असून रिअल-टाइम हवा गुणवत्ता दाखवतो. HEPA आणि फोटोकॅटेलिटिक फिल्टरद्वारे हे 99.97% प्रदूषक काढते. फिल्टरचे आयुष्य जवळपास 12 महिने असल्याने मेंटेनन्स कमी आहे. 4,500 ते 5,500 रुपयांच्या किमतीत हे प्रीमियम लुक आणि दमदार परफॉर्मन्स देते.






