फोटो सौजन्य: X.com
भारतीय ऑटो बाजारात दमदार एसयूव्ही हवी असल्यास अनेक ग्राहक Mahindra कंपनीच्या वाहनांना जास्त प्राधान्य देत असतात. महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा सुद्धा नेहमीच चर्चेत असतात. ते देखील सोशल मीडियावर वारंवार विंटेज कारच्या आठवणींना उजाळा देतात. यावेळी त्यांनी त्यांच्या आईच्या कारबद्दलची माहिती सोशल मीडियावर शेअर केली.
अलीकडेच, आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये समोर महिंद्रा BE6 आणि मागे जुनी फियाट प्रीमियर पद्मिनी दिसत आहे. या दोन्ही कार केवळ तांत्रिकदृष्ट्या वेगळ्या नाहीत तर त्या त्यांच्या काळातील सर्वोत्तम कारपैकी एक होत्या.
🙂 And the first car I ever remember riding in was a sky blue Premier Padmini, or a Fiat, as it was called in the 60’s, which my mother owned and used to drive. She received it five years after booking it, because that’s how long the waiting list for a car was in those days!… https://t.co/np0o8sqCLG — anand mahindra (@anandmahindra) January 24, 2026
या पोस्टच्या माध्यमातून आनंद महिंद्रा यांनी आपल्या आईची आठवण काढली आहे. त्यांनी लिहिले की, त्यांनी पहिल्यांदा ज्या कारमधून प्रवास केला होता, ती आकाशी निळ्या रंगाची प्रीमियर पद्मिनी होती, जिला 60च्या दशकात फिएट म्हणून ओळखले जायचे. ही कार त्यांच्या आईची होती आणि त्या स्वतः ती चालवत असत. त्या काळात कारसाठी मोठी वेटिंग लिस्ट असायची, त्यामुळे बुकिंग केल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी ही कार मिळाली होती. त्यांनी या कारला “ब्लू बेल” असे नाव दिले होते (कारला नाव देण्याची सवय मला त्यांच्याकडूनच लागली, असेही त्यांनी नमूद केले). त्यामुळे तो मॉडेल आणि ब्रँड त्यांच्या दृष्टीने नेहमीच खास राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आनंद महिंद्रा यांची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. यावर अनेकजण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी महिंद्राची पुढील कार “ब्लू बेल” या नावाने येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे, तर काहींच्या मते ती फिएट कार केवळ वाहन नव्हती, तर एक संपूर्ण युग होती—ज्याच्याशी असंख्य आठवणी जोडलेल्या होत्या.






