भविष्यातील स्मार्ट आणि किफायतशीर राइडसाठी 'या' आहेत भारतातील सर्वोत्तम EV Scooters!
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ झपाट्याने वाढत आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमती, पर्यावरणाविषयी वाढलेली जागरूकता आणि कमी रनिंग कॉस्ट यामुळे अनेक ग्राहक आता EV scooters कडे वळत आहेत. गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारात अनेक नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स लॉन्च झाल्या असून त्यामध्ये रेंज, स्मार्ट फीचर्स, चार्जिंग स्पीड आणि परफॉर्मन्स यामध्ये मोठी सुधारणा झाली आहे. आज EV scooter फक्त पर्यावरणपूरक पर्याय राहिलेला नाही, तर तो दैनंदिन प्रवासासाठी प्रॅक्टिकल आणि मॉडर्न उपाय बनला आहे. EV स्कुटर्सची मागणी पाहता भारतात अनेक कंपन्यांनी त्यांच्या EV scooter लॉन्च केल्या आहेत. यात Ather Rizta, TVS iQube, Bajaj Chetak, Ola S1 Pro आणि Vida V1 Pro या काही EV scooter आघाडीवर आहेत.
भारतीय EV बाजारात Ather Energy ने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. कंपनीची Ather Rizta ही स्कूटर विशेषतः फॅमिली युसर्स लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. मोठी सीट, भरपूर स्टोरेज स्पेस आणि आरामदायी रायडींग पोसिशन यामुळे शहरातील दैनंदिन वापरासाठी ही स्कूटर उपयुक्त ठरते. यामध्ये मिळणारे स्मार्ट डॅशबोर्ड, नेव्हिगेशन सपोर्ट आणि कनेक्टेड फीचर्स यामुळे rरायडींग एक्सपीरियन्स अधिक आधुनिक बनतो. Ather चे फास्ट चार्जिंग नेटवर्क देखील ग्राहकांसाठी मोठा फायदा ठरतो.
TVS iQube ही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर्सपैकी एक मानली जाते. TVS Motor Company च्या मजबूत सर्व्हिस नेटवर्क मुळे ग्राहकांचा या स्कूटरवर विश्वास वाढला आहे. iQube चे राईड क्वालिटी खूप स्मूथ मानले जाते. शहरातील ट्राफिक मध्ये ही स्कूटर सहज चालवता येते. त्याचबरोबर बॅटरी मॅनेजमेंट आणि लॉन्ग टर्म रिलायबिलिटी यामुळे अनेक ग्राहक हा पर्याय पसंत करतात.
एकेकाळी भारतीय रस्त्यांवर राज्य करणारे Chetak आता इलेक्ट्रिक अवतारात परतले आहे. Bajaj Chetak चे प्रीमियम मेटल बॉडी डिझाईन आणि मजबूत बिल्ड क्वालिटी ही त्याची मोठी वैशिष्ट्ये आहेत. ही स्कूटर खास करून त्या ग्राहकांसाठी योग्य ठरते जे दीर्घकाळ टिकणारी आणि कमी मेंटेनन्स असलेली EV शोधत आहेत. Bajaj चे सर्व्हिस सपोर्ट आणि ब्रँड ट्रस्ट हे देखील मोठे प्लस पॉईंट मानले जातात.
Ola Electric ने भारतीय EV बाजारात मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. Ola S1 Pro ही स्कूटर मॉडर्न डिजाईन, पॉवरफुल ऍक्सलरेशन आणि futuristic फीचर्स मुळे तरुणांमध्ये लोकप्रिय झाली आहे. मोठा टचस्क्रीन डिस्प्ले, मल्टिपल रायडींग मोडस आणि OTA सॉफ्टवेअर अपडेट्स यामुळे ही स्कूटर इतरांपेक्षा वेगळी ठरते. मात्र EV खरेदी करताना जवळपासचा सर्व्हिस सपोर्ट तपासणे महत्त्वाचे ठरते.
Hero MotoCorp ची Vida V1 Pro ही स्कूटर रिमूव्हेबल बॅटरी सिस्टममुळे चर्चेत आली. अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या किंवा घराबाहेर चार्जिंग सेटअप नसलेल्या ग्राहकांसाठी हा पर्याय खूप सोयीचा ठरतो. याशिवाय मॉडर्न स्टायलिंग आणि प्रॅक्टिकल सिटी परफॉर्मन्स यामुळेही ही स्कूटर तरुण ग्राहकांना आकर्षित करते.
इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करताना फक्त रेंज पाहणे पुरेसे नसते. ग्राहकांनी सर्व्हिस नेटवर्क, बॅटरी वॉरंटी, चार्जिंग इंफ्रास्ट्रक्चर आणि स्पेअर पार्टस अवेलेबिलीटी याकडेही लक्ष द्यायला हवे.
तसेच कंपनीने सांगितलेल्या क्लेमेड रेंज पेक्षा वास्तविक वापरामध्ये रेंज काही प्रमाणात कमी मिळू शकते, त्यामुळे टेस्ट राईड आणि रियल वर्ल्ड रिव्हियूस पाहणे गरजेचे असते.
भारतामध्ये EV अडॉप्शन आता वेगाने वाढत आहे. केंद्र आणि राज्य सरकारांकडून मिळणाऱ्या सबसिडीज, चार्जिंग स्टेशनची वाढती संख्या आणि नवीन टेक्नॉलॉजी मुळे येत्या काही वर्षांत EV scooters ची मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. भविष्यात भारतीय रस्त्यांवर अधिकाधिक electric vehicles दिसतील आणि EV scooters हा सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनेल.
कमी बजेटमध्ये तरुणांची पहिली पसंती असलेल्या “या” आहेत बेस्ट बजेट स्पोर्ट्स बाईक्स






