कालिकाई इंडस्ट्रिज इंडिया आणि संपर्क अॅग्रो लि. ठाणे शाखा पाटण मध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची फसवणूक झाल्याबाबत पाटण पोलीस ठाणे येथे गु.नॉ.क्र. १६/२०२२ कलम ४२०, ४०६, ३४ भा.दं.सं. सह कलम ३ व ४ महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा कडे असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा हे करत आहेत.
कालिकाई इंडस्ट्रिज इंडिया कंपनी, पाटण शाखा या कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आर्थिक व अन्य गुंतवणूक केली आहे, त्यांनी महाराष्ट्र शासन, गृह विभाग शासन परिपत्रक क्र. एमपीआय १११९/ प्र.क्र.०९/पोल-११, दि.२५/०२/२०१९ मध्ये दिलेल्या निर्देशा प्रमाणे गुंतवणूकदारांनी भरुन द्यावयाच्या विहीत नमुन्यातील फॉर्म बाबत तसेच आर्थिक गुंतवणूकीच्या जनजागृतीबाबत पाटण येथे शनिवार दि.१६ मे रोजी सुस्वाद हॉल, पाटण येथे पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवीदारांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस कालिकाई इंडस्ट्रिज आणि संपर्क अॅग्रो मध्ये आर्थिक फसवणूक झालेले ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने ठेविदारांनी करावयाच्या कार्यवाहीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, साताराचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली. यावेळी सहकारी हवालदार वैशाली गुरव, हवालदार संतोष राऊत, संतोष माने यांनी सहकार्य केले.
कालिकाई इंडस्ट्रिज इंडिया आणि संपर्क अॅग्रो या कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आर्थिक व अन्य गुंतवणूक केली आहे, अशा ठेवीदारांनी त्यांनी महाराष्ट्र शासन, गृह विभाग शासन परिपत्रकात दिलेल्या निर्देशा प्रमाणे गुंतवणूकदारांनी भरुन द्यावयाच्या विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन देण्याबाबत दि.१६/०५/२०२६ ते दि.३१/०५/२०२६ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे खालील कागदपत्रांसह चौकशीकामी उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी येताना गुंतवणूक केल्याचा पुरावा, उदाहरणार्थ मुळ ठेव पावती, प्रमाणपत्र, ज्या बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्या आर्थिक व्यवहाराचे बैंक खात्याचे स्टेटमेंट व अन्य पुरावा.
गुंतवणूकदाराचे बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक व सुस्पष्ट दिसणा-या २ झेरॉक्स प्रती, गुंतवणूकदाराचे आधारकार्ड, गुंतवणूकदाराचे पॅनकार्ड, गुंतवणूकदारास अंशतः किंवा पुर्णतः किंवा गुंतवणूकदारास मिळालेल्या परताव्याचा पुरावा,
उदाहरणार्थ: पावती, ज्या बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्या आर्थिक व्यवहाराचे बँक खात्याचे स्टेटमेंट व अन्य पुरावा.
वर नमूद सर्व कागदपत्रांच्या ठळक व सुस्पष्ट दिसणा-या २ झेरॉक्स प्रती आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.






