RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या
आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच धर्मशाळा येथे दुपारचा सामना खेळला जात आहे. हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियममधील पिच फलंदाजांसाठी खूप चांगली मानली जाते. सामन्याच्या सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु खेळ जसजसा पुढे जाईल, तसतसे फिरकी गोलंदाजही फलंदाजासाठी अडचणी निर्माण करु शकतील. या पिचवर दव महत्वाची भूमिका बजावतो. म्हणून पंजाबने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच येथे खेळल्या गेलेले १० सामने हे लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. या स्टेडियमध्ये हवामान चांगले राहण्याची शक्यता असून, तापमान सुमारे २० अंश सेल्सिअस असेल. परंतु, यावेळी पाऊस पडण्याची ३० टक्के शक्यता वर्तवली जात आहे.
आयपीएल २०२५ चा विजेता व उपविजेता संघ आरसीबी आणि पंजाब आयपीएल २०२६ मध्ये पहिल्यांदाच भिडणार आहेत. आरसीबीने आतापर्यंत १२ पैकी आठ सामने जिंकले असून ते पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहेत. तर, पंजाबने १२ सामन्यांपैकी ६ सामने जिंकले असून ते १३ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्स यांच्यात ३७ सामने खेळले गेले आहेत. यापैकी आरसीबीने १९ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने १८ सामने जिंकले आहेत. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग ११– जेकब बेथेल, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, जितेश शर्मा (कर्णधार/विकेटकीपर), टिम डेव्हिड रोमारियो शेफई, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवूड आणि सुयश शर्मा,
इमपॅक्ट सबस्टीट्यूट – रसिक सलाम, जॉर्डन कॉक्स, अभिनंदन सिंह, स्वप्नील सिंह, कनिष्क चौहान
पंजाब किंग्स प्लेइंग ११– प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकिपर), कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यांश शेडगे, शशांक सिंग, अझमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, लॉकी फर्ग्युसन, अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहल.
इमपॅक्ट सबस्टीट्यूट- मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, मुशीर खान, प्रवीण दुबे






