फोटो सौजन्य: iStock
Tata Motors Price Drop: भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने आपल्या ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने व्यावसायिक वाहनांवरील (Commercial Vehicles) जीएसटी कपातीचा (GST reduction) संपूर्ण फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे 22 सप्टेंबर 2025 पासून टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती कमी होणार आहेत.
ही कपात देशभरातील वाहतूकदार, फ्लीट ऑपरेटर आणि लहान व्यावसायिकांसाठी एक मोठा दिलासा आहे. कमी झालेल्या किमतींमुळे वाहने खरेदी करणे अधिक सोपे होईल, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायातील एकूण खर्च (Total Cost of Ownership) कमी होईल आणि नफ्यात वाढ होईल.
टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक, श्री. गिरीश वाघ यांनी या निर्णयाबद्दल बोलताना सांगितले की, “व्यावसायिक वाहनांवरील जीएसटी १८% पर्यंत कमी करणे हे वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला चालना देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे. जीएसटी कौन्सिलच्या या प्रगतीशील सुधारणांचा फायदा आम्ही थेट ग्राहकांना देत आहोत. यामुळे भारताच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या आमच्या ग्राहकांना मदत मिळेल.”
ही किंमत कपात फ्लीट आधुनिकीकरणाला (fleet modernization) प्रोत्साहन देईल, ज्यामुळे वाहतूक क्षेत्रात अधिक प्रगत आणि स्वच्छ वाहनांचा वापर वाढेल. या सणासुदीच्या काळात ग्राहक आपल्या पसंतीच्या वाहनाची बुकिंग लवकर करून या लाभाचा फायदा घेऊ शकतात. या संदर्भात अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या अधिकृत टाटा मोटर्स शोरूमला भेट देऊ शकता.