Akshaye Khanna चे कार कलेक्शन
सध्या बॉक्स ऑफिसवर आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपट चांगलाच गाजतोय. मात्र, या चित्रपटाचा नायक जरी रणवीर सिंग असला तरी त्यांच्यापेक्षा अक्षय खन्नाची जोरदार चर्चा होत आहे. चित्रपट पाहणारा प्रत्येक जण अक्षय खन्नाच्या अभिनयाचे गोडवे गात आहे. खासकरून, चित्रपटातील अक्षय खन्नाचा एंट्री सिन सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहे. मात्र, तुम्हाला त्याच्या कार कलेक्शनबद्दल ठाऊक आहे का? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आम्हीच इकडचे बादशाह! नोव्हेंबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ Cars घेतल्या डोक्यावर, विक्रीत मोठी वाढ
अक्षय खन्नाचे कार कलेक्शन देखील प्रभावी आहे. त्याच्या गॅरेजमध्ये मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, बीएमडब्ल्यू ५ सिरीज आणि टोयोटा फॉर्च्युनरसह अनेक लक्झरी कार आहेत. बहुतेक बॉलिवूड स्टार्सप्रमाणे, अक्षय खन्ना महागड्या सुपरकार्स, खाजगी जेट किंवा पार्ट्यांवर पैसे खर्च करत नाही. त्यापेक्षा तो शांत आणि साधे जीवन जगणे पसंत करतो. चला या कार्सबद्दल जाणून घेऊयात.
Mercedes-Benz ची ही कार अनेक लक्झरी फीचर्स सुसज्ज आहे. तसेच यात प्रगत टेक्नॉलॉजी सुद्धा पाहायला मिळते. या कारला Global NCAP कडून 5 स्टार रेटिंग सुद्धा मिळाली आहे. या आलिशान कारची किंमत 1.78 कोटी ते 3 कोटी दरम्यान असण्याची शक्यता आहे.
भारतात BMW च्या गाडयांना एक वेगळीच डिमांड असते. अशीच एक कार म्हणजे BMW 5 Series. या कारची किंमत 72.90 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.
Creta, Sierra चा मार्केट खाण्यासाठी नवीन Kia Seltos सज्ज! मिळणार अफलातून फीचर्स
एसयूव्ही सेगमेंटमध्ये टोयोटा फॉर्च्युनरला सर्वाधिक मागणी मिळते. ही एसयूव्ही नेते मंडळी आणि सेलिब्रेटींच्या कार कलेक्शमध्ये हमखास पाहायला मिळते. या एसयूव्हीची किंमत 33.65 लाखांपासून (एक्स-शोरूम) सुरु होते.






