फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे इंधनाच्या किमतीत झपाट्याने होणारी वाढ. पूर्वी ज्या कंपन्या फक्त इंधनावर चालणाऱ्या कार बनवत होत्या त्याच आज इलेक्ट्रिक वाहनांवर आपले लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. त्यातही इलेक्ट्रिक स्कूटरला भारतात विशेष मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेऊन अनेक, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या बेस्ट रेंज देणाऱ्या ई स्कूटर मार्केटमध्ये आणत आहे. पण आजही कित्येक ग्राहक ई स्कूटरकडे खरेदी करण्यापेक्षा पेट्रोल स्कूटर खरेदी करत आहे. हीच बाब लक्षात घेऊन आज आपण इलेक्ट्रिक स्कूटर चांगले की पेट्रोल स्कूटर? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
इलेक्ट्रिक स्कूटर: जर तुम्ही पर्यावरणाचा विचार करून स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी योग्य ठरणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटर हवेत CO2 उत्सर्जित करत नाहीत, ज्यामुळे प्रदूषण कमी होते.
टाकी फुल्ल केल्यास कापेल 750 km चे अंतर ! फक्त 10 हजारात करा ‘ही’ बजेट बाईक तुमच्या नावावर
पेट्रोल स्कूटर: हे इलेक्ट्रिक स्कूटरपेक्षा जास्त प्रदूषण करते. खरंतर, रस्त्यावर चालण्यासाठी पेट्रोलची आवश्यकता असते. हे पेट्रोल इंजिनमध्ये जाळल्यावर वातावरणात CO2 आणि इतर हानिकारक वायू सोडते जे पर्यावरणासाठी हानिकारक ठरतात.
इलेक्ट्रिक स्कूटर: ही स्कूटर चार्ज करण्यासाठी खूप कमी खर्च येतो. इलेक्ट्रिक स्कूटर चार्ज करण्यासाठी अंदाजे 1 युनिट (kWh) वीज खर्च होते. ई स्कूटरच्या साहाय्याने तुम्ही कमी खर्चात जास्त अंतर प्रवास करू शकता.
पेट्रोल स्कूटर: पेट्रोलची किंमत सतत वाढत आहे आणि तुम्हाला त्याच्या मायलेजनुसार नेहमीच पेट्रोल भरावे लागते, ज्यामुळे तुमचा खर्च देखील वाढू शकतो.
इलेक्ट्रिक स्कूटर: या स्कूटरचे मेंटेनन्स करणे खूप सोपे आहे. पण या स्कॉउटरची योग्य काळजी घेणे फार महत्वाचे आहे.
पेट्रोल स्कूटर: या स्कूटरमध्ये इंजिन, गिअर्स, एक्झॉस्ट आणि इतर अनेक पार्टस वापरले जातात. स्कूटर योग्यरित्या चालण्यासाठी त्याची वेळोवेळी सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स आवश्यक असते. जे कधीकधी महाग देखील असू शकते.
10 हजारांपेक्षा कमी पैसे भरून Hunter 350 होईल तुमच्या नावावर, फक्त जाणून घ्या EMI चं संपूर्ण गणित
इलेक्ट्रिक स्कूटर: जवळजवळ सर्व इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज मॉडेल आणि बॅटरी क्षमतेनुसार 60-100 किलोमीटर दरम्यान असते. त्याच वेळी, त्यांना चार्ज करण्यासाठी देखील वेळ लागतो, जो सुमारे 4-8 तासांचा असू शकतो.
पेट्रोल स्कूटर: या स्कूटरचा मायलेज जास्त असतो, एकदा टाकी भरली की ते सुमारे 200-300 किलोमीटर मायलेज देते. त्याच वेळी, पेट्रोल भरण्यासाठी फक्त काही मिनिटे लागतात, ज्यामुळे ते लॉंग राइडसाठी या स्कूटर अधिक योग्य पर्याय बनतात.
ई स्कूटर फायदेशीर की पेट्रोल? याचे उत्तर तुमच्या आवश्यकतेवर निर्भर आहे. जर तुम्ही पर्यावणाचा जास्त विचार करत असाल तर मग ई स्कूटर तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते. पण जर तुम्ही लांब पल्ल्याच्या अंतरासाठी वाहन शोधात असाल तर मग पेट्रोल स्कूटर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरेल.