फोटो सौजन्य: @autocarindiamag (X.com)
देशात इलेक्ट्रिक वाहनांना अच्छे दिन येत आहे. आज एखादे नवीन वाहन खरेदी करताना ग्राहक पहिले EV पर्यायाचा विचार करत असतात. तसेच EVs चा मेंटेनन्स कॉस्ट हा कमी असल्याने ते बजेट फ्रेंडली वाहन म्हणून ओळखले जाते. देशात इलेक्ट्रिक दुचाक्यांना सुद्धा चांगली मागणी मिळत आहे.
देशात अनेक वर्षांपासून ओला कंपनी इलेक्ट्रिक स्कूटर ऑफर करते. तसेच काळानुसार कंपनी त्याच्या स्कूटरमध्ये नवीन टेक्नॉलॉजी आणत असते. आता असे म्हंटले जात आहे की कंपनी ॲडव्हान्स ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) टेक्नॉलॉजी त्यांच्या स्कूटरमध्ये आणणार आहे.
RushLane च्या एका अहवालानुसार, ओला इलेक्ट्रिक त्यांच्या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर S1 प्रो स्पोर्टच्या ॲडव्हान्स व्हर्जनवर काम करत आहे. ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर केवळ इलेक्ट्रिक स्कूटरमध्येच नाही तर दुचाकी बाजारपेठेच्या क्षेत्रातही एक नवीन बेंचमार्क स्थापित करेल. भारतीय बाजारपेठेतील ही सर्वात फीचर्सपूर्ण दुचाकी असेल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आतापर्यंत ADAS फक्त कारमध्ये येत आहे, जे अनेक सेफ्टी फीचर्सचे कॉम्बिनेशन आहे.
रिपोर्टनुसार, येणारा Ola S1 Pro Sport हा बाकी S1 सीरिजमधील मॉडेल्सपेक्षा वेगळा दिसणार आहे. यात स्ट्रीट-स्टाइल फेअरिंग, उभ्या रेसिंग स्ट्राइप्स आणि मागे स्प्लिट ग्रॅब रेल्स असतील. याशिवाय नवीन रियर-व्ह्यू मिरर, सीट कव्हर, स्विंग आर्म कव्हर, फ्लोर मॅट आणि बदललेले बॉडी डीकल्स असतील. मात्र, या स्कूटरमध्ये लुक्सपेक्षा त्याची ॲडव्हान्स फंक्शनॅलिटी अधिक खास असेल.
कंपनी बऱ्याच काळापासून एका खास ADAS तंत्रज्ञानावर काम करत आहे, जे कारमधील सिस्टमपेक्षा वेगळे असेल. हे विशेषतः शहरात राइडिंग अनुभव अधिक चांगला करण्यावर लक्ष केंद्रीत करेल आणि रायडरला रिअल-टाईम अलर्ट देऊन सुरक्षित प्रवासास मदत करेल.
दिसताच क्षणी मनात घर करेल अशी Mahindra Vision X SUV Concept सादर, डिझाइन तर अगदी फ्यूचरिस्टिक
या स्कूटरमध्ये फ्रंट डॅशकॅम मिळणार आहे, जो रस्त्यावर होणाऱ्या अप्रिय घटनांची नोंद करण्यास मदत करेल आणि व्लॉगर्ससाठीही उपयुक्त ठरेल. याशिवाय यात 7-इंच TFT टचस्क्रीन, ब्रेक-बाय-वायर सिस्टमसह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, मल्टिपल राइड मोड्स, मोटर साउंड्स आणि अॅडॅप्टिव्ह बूस्ट यांसारखे फीचर्स असतील.