निसान कंपनीने Nisaan Magnite वर 10 वर्षाच्या एक्स्टेंडेड वॉरंटीची घोषणा केली
निस्सान मोटर इंडियाने भारतातील सर्वात सुरक्षित बी-एसयूव्हींपैकी एक मानल्या जाणाऱ्या न्यू निस्सान मॅग्नाइटसाठी पहिला 10 वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन जाहीर केला आहे. जीएनसीएपीकडून 5-स्टार सुरक्षा रेटिंग मिळाल्यानंतर हा ग्राहक-केंद्रित उपक्रम सुरु करण्यात आला आहे, ज्यामुळे ब्रँडची गुणवत्ता, विश्वासार्हता आणि दीर्घकालीन वचनबद्धता अधोरेखित होते.
या योजनेत 3 वर्षांची स्टॅंडर्ड वॉरंटी असून ती 10 वर्षे / 2 लाख किमीपर्यंत वाढवता येते. ग्राहकांना 3+7, 3+4, 3+3, 3+2 आणि 3+1 वर्षांच्या फ्लेक्सिबल पर्यायांतून निवड करता येते. या प्लॅनमुळे फक्त 22 पैसे प्रति किमी किंवा 12 रुपये प्रति दिवस या परवडणाऱ्या दरात दशकभराचा ड्रायव्हिंग आत्मविश्वास आणि संरक्षण मिळते.
दिसताच क्षणी मनात घर करेल अशी Mahindra Vision X SUV Concept सादर, डिझाइन तर अगदी फ्यूचरिस्टिक
स्टॅंडर्ड वॉरंटीनंतर 7 वर्षांपर्यंत कॉम्प्रेहेन्सिव्ह संरक्षण मिळते. हा प्लॅन फक्त 3 वर्षांच्या स्टँडर्ड वॉरंटी असलेल्या आणि ऑक्टोबर 2024 नंतर लाँच झालेल्या न्यू निस्सान मॅग्नाइटसाठी लागू असेल. पूर्वीच्या 2 वर्षांच्या स्टॅंडर्ड वॉरंटीसह विकल्या गेलेल्या मॉडेल्ससाठी हा प्लॅन उपलब्ध नसेल.
ग्राहकांना एक्स्टेंडेड वॉरंटी योजना नवीन वाहन खरेदी करताना किंवा मानक वॉरंटी संपण्यापूर्वी कोणत्याही अधिकृत निस्सान डीलरकडून घेता येते. कव्हरेज अंतर्गत देशभरातील निस्सान-अधिकृत सेवा केंद्रांमध्ये कॅशलेस दुरुस्तीची सुविधा मिळते, दाव्यांवर संख्या किंवा मूल्याची कोणतीही मर्यादा नसते आणि केवळ जेन्युइन निस्सान पार्ट्स वापरले जातात. याशिवाय, निस्सान फायनान्सद्वारे या योजनेचा सुलभ वित्तपुरवठा करता येतो.
‘या’ कार्सचे नाव लक्षात ठेवा ! August 2025 मध्ये मिळताय 10 लाखांपर्यंतचे डिस्काउंट
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले, “न्यू निस्सान मॅग्नाइट ही गुणवत्ता, सुरक्षितता आणि दीर्घकालीन मूल्याचे प्रतीक आहे. 5-स्टार सुरक्षा रेटिंगनंतर आमचा 10 वर्षांचा एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅन ग्राहकांना चिंतामुक्त मालकीचा अनुभव देईल. यामुळे ते त्यांच्या मॅग्नाइटचा आनंद तडजोड न करता घेऊ शकतील.”
न्यू निस्सान मॅग्नाइटमध्ये 6 एअरबॅग्ज, सुधारित बॉडी स्ट्रक्चर, एबीएस+ईबीडी, ईएससी, टीसीएस, एचएसएस, ब्रेक असिस्ट, टीपीएमएससह 40+ सेफ्टी फीचर्स आहेत. अलीकडेच लाँच झालेल्या कुरो स्पेशल एडिशनने तिच्या प्रीमियम आकर्षणात भर घातली आहे.
आज ६५+ देशांमध्ये उपलब्ध असलेली न्यू निस्सान मॅग्नाइट बी-एसयूव्ही सेगमेंटमध्ये आपली बोल्ड डिझाइन, उत्कृष्ट फीचर्स आणि व्यापक सुरक्षा पॅकेजमुळे वेगळी ओळख निर्माण करत आहे. १० वर्षांच्या एक्स्टेंडेड वॉरंटी प्लॅनमुळे आता तिच्या ग्राहकांना दशकभराची मनःशांती मिळणार आहे.