भारतीयांची लाडकी Hero Passion Plus ची नवीन किंमत थेट हजारांवर
22 सप्टेंबर पासून वाहनांवरील GST चे नवीन दर लागू झाले आणि यामुळे ऑटो इंडस्ट्री आणि वाहन खरेदीदारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जीएसटीत झालेल्या कपातीमुळे बाईकच्या किमतीत सुद्धा घट झाली आहे. अनेक कम्युटर बाईक ज्या आधीपासूनच स्वस्त होत्या त्या आता अजूनच स्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे विविध बाईकच्या शोरूममध्ये वाहन खरेदीदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अशीच एक कम्युटर बाईक म्हणजे Hero Passion Plus.
हिरो पॅशन प्लस ही देशातील एक लोकप्रिय आणि परवडणारी कम्युटर बाईक आहे. जीएसटी कमी झाल्यानंतर, ही बाईक पूर्वीपेक्षा अधिक स्वस्त झाली आहे. जर तुम्ही परवडणारी बाईक शोधत असाल तर हिरो पॅशन प्लस हा एक तुमच्यासारखा एक चांगला पर्याय असू शकतो.
जीएसटी कपातीनंतर, दिल्लीतील हिरो पॅशन प्लसची एक्स-शोरूम किंमत 76,691 रुपयांपर्यंत घसरली आहे. पूर्वी, या बाईकची किंमत अंदाजे 83 हजार 190 ररुपये होती.
Toyota ची ‘ही’ SUV फक्त काहीच सेकंदात तुमच्या घरी होईल दाखल, फक्त इतकाच असेल EMI?
हिरो पॅशन प्लसमध्ये 97.2 सीसी, सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, OBD2B इंजिन आहे जे 7.91 बीएचपी आणि 8.05 एनएम टॉर्क निर्माण करते. ते 4-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे आणि त्याचा टॉप स्पीड ताशी 85 किमी आहे. ही बाईक प्रति लिटर 70 किलोमीटरचा मायलेज देते आणि 11-लिटर फ्युएल टॅंकसह , ही बाईक फुल टॅंकवर 750 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकते, जे दैनंदिन प्रवाशांसाठी एक चान्गगली होष्ट आहे.
हिरो पॅशन प्लसमध्ये अनेक फीचर्स आहेत जी अतिशय व्यावहारिक आणि दैनंदिन वापरासाठी उपयुक्त आहेत. यामध्ये i3S तंत्रज्ञान, एक सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, एक ट्रिप मीटर, एक ओडोमीटर, एक इंधन गेज, एक USB चार्जिंग पोर्ट आणि एक साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ समाविष्ट आहे. रायडर्सच्या सुरक्षिततेसाठी, यात पुढील आणि मागील दोन्ही चाकांवर 130 मिमी ड्रम ब्रेक आहेत, जे इंटिग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (IBS) सह येतात. ही ब्रेकिंग सिस्टम बाईकला आणखी सुरक्षित बनवते.
2030 पर्यंत A\I ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?
हिरो पॅशन प्लस प्रामुख्याने Honda Shine 100 सारख्या 100 सीसी बाइक्सशी स्पर्धा करते. ती टीव्हीएस रेडियन आणि बजाज प्लॅटिना सारख्या बाईक्सशी देखील स्पर्धा करते. ही एक परवडणारी आणि फ्युएल एफिशियंट कम्युटर बाईक आहे.