होंडाची नवी कोरी बाईक
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) यांनी मुंबई, महाराष्ट्रात नवी CB125 Hornet आणि Shine 100 DX सादर केली. नवी होंडा CB125 Hornet ची किंमत (स्पेशल इंट्रोडक्टरी ऑफरमध्ये) रु. १,१२,००० ठेवण्यात आली आहे, तर Shine 100 DX ची किंमत रु. ७५,९५० आहे. (सर्व किंमती एक्स-शोरूम, मुंबई). कंपनीने दोन्ही मोटरसायकल्सच्या मेगा ग्राहक डिलिव्हरीलादेखील सुरुवात केली आहे.
नेक्स्ट-जेन रायडर्सना लक्षात घेऊन डिझाइन केलेली CB125 हॉर्नेट ही ‘Ride Your Rizz’ या भावनेसह येते. यामध्ये स्पोर्टी स्टाईलिंग आणि दमदार परफॉर्मन्स आहे. तर शाइन 100 DX आपली परंपरा पुढे नेत अधिक फीचर्स आणि प्रीमियम डिझाइनसह ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करते – ज्याचं टॅगलाइन आहे, ‘Solid Hai’. ग्राहक आपल्या जवळच्या होंडा अधिकृत डिलरशिपला भेट देऊन या बाईक्स बुक करू शकतात.
कसे आहे डिझाईन
होंडा CB125 हॉर्नेट मध्ये अॅग्रेसिव्ह स्ट्रीट-स्टाईल डिझाइन देण्यात आलं आहे आणि ती चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे – पर्ल सायरन ब्लू विथ लेमन आईस यलो, पर्ल इग्नियस ब्लॅक, पर्ल सायरन ब्लू विथ अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, आणि पर्ल सायरन ब्लू विथ स्पोर्ट्स रेड. या बाईकमध्ये सेगमेंटमधील पहिल्यांदाच गोल्डन USD फ्रंट फोर्क्स, पूर्ण LED लाइटिंग सिस्टीम, आणि ब्लूटूथ-एनेबल्ड होंडा रोडसिंक कनेक्टिव्हिटीसह 4.2-इंच TFT डिस्प्ले दिला आहे, ज्यामधून नेव्हिगेशन, कॉल्स आणि SMS अलर्ट्स सहज मिळतात.
फक्त ‘इतक्या’ लाखांचं डाउन पेमेंट Maruti Eeco ची चावी सरळ तुमच्या हातात, किती असेल EMI?
चार्जिंग फिचर्स
अतिरिक्त फिचर्समध्ये युनिव्हर्सल Type-C चार्जिंग पोर्ट आणि 240mm फ्रंट पेडल डिस्क (सिंगल-चॅनल ABS सह) देण्यात आली आहे. CB125 हॉर्नेटला पॉवर देतो 123.94cc सिंगल-सिलिंडर, फ्युएल-इंजेक्टेड, OBD2B कंप्लायंट इंजिन, जे 8.2 kW पॉवर आणि 11.2 Nm पीक टॉर्क निर्माण करतो. यासोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही बाईक फक्त 5.4 सेकंदांत 0 ते 60 km/h वेग गाठते आणि आपल्या सेगमेंटमधील सर्वात वेगवान मोटरसायकल ठरते.
होंडा शाईनचे स्पेसिफिकेशन
दुसरीकडे, होंडा शाइन 100 DX आपली आयकॉनिक ‘Shine’ लिगसी पुढे नेत एक ताजं आणि प्रीमियम डिझाइन घेऊन आली आहे. यात नवीन डिझाइन केलेला क्रोम गार्निशिंगसह हेडलॅम्प, आकर्षक बॉडी ग्राफिक्स, रुंद स्कल्प्टेड फ्युएल टँक, ऑल-ब्लॅक इंजिन व ग्रॅब रेल, आणि क्रोम मफलर कव्हर देण्यात आले आहे. ही बाईक चार स्टायलिश रंगांमध्ये उपलब्ध आहे – पर्ल इग्नियस ब्लॅक, इम्पीरियल रेड मेटॅलिक, अॅथलेटिक ब्लू मेटॅलिक, आणि जेनी ग्रे मेटॅलिक.
Tata आणि Maruti च्या कार शोरुमध्येच पडीक, वाहन खरेदीदार GST कपातच्या प्रतीक्षेत
ग्राहकांना उपयोगी
ग्राहकांच्या बदलत्या गरजांना पुरक अशी शाइन 100 DX एक डिजिटल LCD इन्स्ट्रुमेंट क्लस्टर घेऊन आली आहे, ज्यामध्ये रिअल-टाइम मायलेज, डिस्टन्स-टू-एम्प्टी आणि सर्व्हिस ड्यू रिमाईंडर्स दिसतात. या बाईकच्या हृदयात आहे 98.98cc सिंगल-सिलिंडर, फ्युएल-इंजेक्टेड, OBD2B कंप्लायंट इंजिन ज्यात होंडाची विश्वासार्ह eSP (Enhanced Smart Power) टेक्नॉलॉजी दिली आहे. हे इंजिन 5.43 kW पॉवर आणि 8.04 Nm पीक टॉर्क निर्माण करतं, ज्यासोबत 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.