फोटो सौजन्य - Social Media
भारतात इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देताना होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने आज बेंगळुरूच्या मल्लेश्वरम येथील मण्ट्री स्क्वेअर मॉलमध्ये देशातील पहिले EV कॉन्सेप्ट स्टोअर सुरू केले. या स्टोअरद्वारे ग्राहकांना होंडाच्या नव्या इलेक्ट्रिक वाहनांबद्दल सखोल माहिती मिळणार असून, इलेक्ट्रिक तंत्रज्ञानाची थेट अनुभूती देखील घेता येणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात होंडाने आपल्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक दुचाकी ACTIVA e: साठी नवीन आणि किफायतशीर Battery as a Service (BaaS) Lite योजना जाहीर केली आहे. या योजनेत ग्राहकांना दरमहा फक्त ₹678 मध्ये 20kWh बॅटरी वापरण्याची सुविधा मिळणार आहे. हे दर खास कमी वापर असलेल्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आले आहेत.
EV कॉन्सेप्ट स्टोअरचे वैशिष्ट्य
हे EV स्टोअर केवळ उत्पादन प्रदर्शनाचे स्थळ नसून, एक अनुभवात्मक केंद्र आहे. येथे ACTIVA e: आणि QC1 या होंडाच्या नव्या इलेक्ट्रिक दुचाकींची थेट झलक ग्राहकांना मिळते. स्टोअरमध्ये मोठा LED इंटरअॅक्टिव्ह डिस्प्ले, होंडाचा इतिहास भिंत प्रदर्शन, आणि किड्स झोन यासारखी अनेक आकर्षणं आहेत. Safe Tech Zone मध्ये ACTIVA e: मधील महत्त्वाचे घटक – PMS मोटर, चार्जर, मोबाईल पॉवर पॅक (MPP), हब मोटर – यांचे कार्य थेट पाहता येते. याठिकाणी Honda Power Pack Exchanger e: चा वापर करून बॅटरी स्वॅपिंग प्रक्रिया प्रत्यक्ष डेमोद्वारे दाखवण्यात येते. स्टोअरमध्ये Honda Jet चे मॉडेल, Electric Go-Kart (eGX) आणि एक खास फोल्ड होणारी इलेक्ट्रिक स्कूटर Moto Compacto प्रदर्शित करण्यात आली आहे. ही स्कूटर फक्त १९ किलो वजनाची असून, एका चार्जमध्ये २० किमी पर्यंत चालते.
ACTIVA e: एक स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर
ACTIVA e: ही दुचाकी Honda Mobile Power Pack e: प्रणालीवर आधारित असून, दोन 1.5 kWh बॅटऱ्यांच्या मदतीने ती १०२ किमी रेंज* देते. या बॅटऱ्या सहज बदलता येण्याजोग्या आहेत. ACTIVA e: साठी तीन बॅटरी प्लान्स – Lite ₹678 (20kWh), Basic ₹1,999 (35kWh) आणि Advance ₹3,599 (87kWh) उपलब्ध आहेत.
हे EV स्टोअर आणि ACTIVA e: साठीची नवीन योजना ही भारतातील इलेक्ट्रिक वाहतूक युगाची सुरुवात ठरू शकते. कमी खर्च, वापरण्यास सुलभता आणि पर्यावरणपूरकता यामुळे हा पर्याय तरुण पिढीला आकर्षित करणार हे नक्की.