फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार चालवण्यात एक वेगळाच थ्रिल असतो. रस्ता स्वच्छ आणि मोकळा असताना आपण स्पीड वाढवतो. परंतु, अशा वेळी काही घटनाही घडू शकतात, ज्यामुळे आपला आत्मविश्वास डळमळतो. धावत्या कारचा ब्रेक फेल होणे ही अशीच एक भयानक आणि भीतीदायक घटना आहे. या घटनेत चालकाच्या मनात धडकी भरते, कारण त्याला नियंत्रण गमावण्याची आणि अपघाताची भीती वाटते. कारचा ब्रेक फेल होणे, अत्यंत धोकादायक ठरू
काय सांगता ! Activa च्या USP सोबतच झाला मोठा गेम, इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये नसणार ‘हा’ फिचर
कार चालवताना ब्रेक फेल होणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी एक भयानक स्वप्न असते. ब्रेक फेल झाल्यामुळे वाहनांचा भयानक अपघात होतात अशी अनेक घटना आपण पाहिलेले आहेत. अशा परिस्थितीत, जीव वाचवणे खूप कठीण होऊन बसते. विशेषतः जेव्हा वाहन जास्त वेगाने जात असते. अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह प्रवास करत असाल तर काय होईल? जर तुम्ही तुमच्या कुटुंबासह दररोज कारने प्रवास करत असाल, तर ब्रेक फेल झाल्यास कार सुरक्षितपणे थांबवण्यासाठी तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स देखील माहित असायला हव्यात.
तुमचे मन स्थिर ठेवा: सर्वप्रथम, तुम्ही तुमचे मन स्थिर आणि शांत ठेवण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे, कारण तेव्हाच तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता. तसेच वेळेत आवश्यक पाऊले उचलू शकता. म्हणून, ब्रेक फेल झाल्यास घाबरून जाण्याऐवजी, तुमचे मन स्थिर ठेवा आणि पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करा.
कारसोबतच अन्य वाहनांची वाढणार सेफ्टी ! Commercial Vehicle साठी सरकारडून ‘ही’ महत्वाची सूचना जारी
एक्सिलरेटर वरचा पाय काढा: आता तुम्हाला तुमचा पाय अॅक्सिलरेटरवरून काढावा लागेल जेणेकरून कारचा वेग आणखी वाढू नये आणि ती सुरक्षितपणे थांबवता येईल.
हँडब्रेकचा वापर: कारचा ब्रेक झाल्यानंतर तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि हँडब्रेक आरामात वापरावा लागेल. परंतु तुम्ही हे वेगाने करू नये कारण यामुळे कार घसरू शकते. म्हणून, तुमच्या कारमध्ये हँडब्रेक खूप काळजीपूर्वक वापरा जेणेकरून कार नियंत्रित पद्धतीने थांबेल.
कमी गिअरमध्ये शिफ्ट करा: जेव्हा वाहनाचा वेग कमी होतो, तेव्हा तुम्हाला डाउनशिफ्टिंगची प्रक्रिया सुरू करावी लागेल आणि वेगासोबतच गिअर देखील कमी करावे लागतील, अन्यथा तुम्हाला वाहन योग्यरित्या थांबवण्यात अडचण येईल.
हॉर्न आणि हेडलाइट्स वापरा: येणाऱ्या वाहनांना सावध करण्यासाठी आणि रस्त्यावरील इतर वाहने व लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी जोरात आणि वारंवार हॉर्न वाजवा.