फोटो सौजन्य: @RicardoOramas/X.com
तरुणांमध्ये नेहमीच हाय परफॉर्मन्स बाईकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार बाईक ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे कावासाकी. नुकतेच Kawasaki ने त्यांची नवीन बाईक ऑफर केली आहे.
कावासाकीने त्यांची लोकप्रिय ३०० सीसी ॲडव्हेंचर बाईक, 2026 Kawasaki Versys X 300 लाँच केली आहे. या नवीन व्हर्जनमध्ये काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. चला या बदलांबद्दल जाणून घेऊयात.
जपानच्या मोबिलिटी शो 2025 मध्ये Toyota FJ Cruiser सादर, लूक आणि फीचर्सच्या बाबतीत तोडच नाही
कावासाकीने त्यांच्या लोकप्रिय ॲडव्हेंचर बाईकचे 2026 व्हर्जन, Versys-X 300 लाँच केले आहे. या बाईकमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण बदल केलेले नाहीत, परंतु या नवीन व्हर्जनमध्ये काही किरकोळ अपडेट्स आहेत. आता ती दोन रंगांच्या पर्यायांमध्ये दिली जाईल: Candy Lime Green आणि Metallic Flat Spark Black. या नवीन व्हर्जनमध्ये थोडासा ग्राफिक बदल देखील आहे, इंधन टाकीवर नवीन ‘व्हर्सिस-एक्स’ स्टिकर आहे. मात्र, बाईकचा बेस कलर तोच आहे. तसेच याचा आकार आणि डिझाइन तेच आहे.
2026 Versys-X 300 मध्ये पूर्वीप्रमाणेच 296 cc लिक्विड-कूल्ड, पॅरेलल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 40 PS पॉवर आणि 26 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आला आहे, ज्यासोबत असिस्ट आणि स्लिपर क्लच देखील आहे.
इंजिनचे परफॉर्मन्स मागील व्हर्जनप्रमाणेच असून, ही बाईक लाँग-डिस्टन्स टूरिंग आणि ॲडव्हेंचर रायडिंगसाठी अत्यंत योग्य मानली जाते.
2026 Versys-X 300 मध्ये सेमी-डिजिटल कन्सोल देण्यात आला आहे, ज्यात टॅकोमीटर एनालॉग आहे.
या बाईकमध्ये सर्व लाइट्स हॅलेजन प्रकारच्या आहेत. याशिवाय Kawasaki कडून काही ऑप्शनल अॅक्सेसरीज देखील उपलब्ध आहेत, जसे की पॅनीयर्स, फॉग लॅम्प्स, हँड गार्ड्स आणि सेंटर स्टँड, ज्यामुळे बाईक आणखी प्रॅक्टिकल आणि ट्रॅव्हल-फ्रेंडली बनते.
2026 Versys-X 300 ची एक्स-शोरूम किंमत 3.49 लाख रुपये आहे, जी मागील मॉडेलइतकीच ठेवण्यात आली आहे. या नवीन व्हर्जनमध्ये मोठे बदल नसले तरी, ब्लू कलर ऑप्शन काढून टाकण्यात आला आहे आणि ग्राफिक्समध्ये सूक्ष्म बदल करण्यात आले आहेत.
भारतीय बाजारात या बाईकची स्पर्धा Yezdi Adventure आणि नुकतीच लाँच झालेली TVS Apache RTX300 सोबत होणार आहे.






