फोटो सौजन्य: @Motormatiq (X.com)
टाटा मोटर्सने 2025 मध्ये त्यांच्या लोकप्रिय प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले आहे. बेस व्हेरियंट पेट्रोल एमटी स्मार्टची किंमत 6.89 लाख रुपये आहे. या कारमध्ये पहिल्यांदाच सेगमेंट फर्स्ट फ्लश डोअर हँडल दिसत आहेत जे तिला प्रीमियम एसयूव्हीसारखे लूक देतात. ग्राहक ही कार ५ व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकतात (स्मार्ट, प्युअर, क्रिएटिव्ह, अकम्प्लिश्ड एस आणि अकम्प्लिश्ड + एस).
जर तुम्ही अल्ट्रोजची फेसलिफ्ट व्हर्जन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज आपण या कारच्या ईएमआयबद्दल जाणून घेणार आहोत.
बुलेटचा सुद्धा माज उतरवेल ‘ही’ बाईक, महागड्या किमतीत झाली आहे लाँच
जर तुम्ही टाटा अल्ट्रोज फेसलिफ्टसाठी 89,000 रुपयांचे डाउन पेमेंट करून 6 लाख रुपयांचे लोन घेतले तर व्याजदराच्या आधारे तुमचा 7 वर्षांच्या कालावधीसाठीचा मासिक ईएमआय 8% व्याजदराने 9,352 रुपये, 8.5% व्याजदराने 9,502 रुपये, 9% व्याजदराने 9,653 रुपये, 9.5% व्याजदराने 9,806 रुपये आणि 10% व्याजदराने 9,961 रुपये असेल. लक्षात घ्या यामध्ये इंश्युरन्स, आरटीओ चार्जेस आणि इतर अतिरिक्त खर्च समाविष्ट नाहीत, जे तुम्हाला वेगळे द्यावे लागतील.
डिझाइनच्या बाबतीत, नवीन टाटा अल्ट्रोझ फेसलिफ्टमध्ये नवीन शार्प आणि एलिगंट फ्रंट ग्रिल, ट्विन पॉड प्रोजेक्टर एलईडी हेडलॅम्प, स्पोर्टी बंपर डिझाइनसह मोठे एअर इनटेक, एलईडी फॉग लॅम्प, सेगमेंट-फर्स्ट फ्लश प्रकारचे डोअर हँडल आणि 16-इंच अलॉय व्हील्स असे आकर्षक बदल करण्यात आले आहेत.
या कारच्या इंटिरिअरमध्ये नवीन प्रकाशित स्टीअरिंग व्हील, ग्लॉस ब्लॅक फिनिशसह पांढरी अॅम्बियंट लाइटिंग, टच-बेस्ड एसी कंट्रोल्स, दोन 10.25 -इंच डिस्प्ले (एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरे इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी) आणि ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये अपडेटेड गिअर लीव्हर मिळते. याशिवाय, त्यात मागील एसी व्हेंट्स, ऑटोमॅटिक एसी, सनरूफ, क्रूझ कंट्रोल, वायरलेस चार्जर, एअर प्युरिफायर, पुश स्टार्ट-स्टॉप बटण आणि कनेक्टेड कार टेक्नॉलजी यासारख्या आधुनिक फीचर्सचा समावेश आहे.
95 KM ची रेंज ! Suzuki च्या ‘या’ पहिल्या वाहिल्या Electric Scooter चे भारतात प्रोडक्शन सुरु
इंजिन ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर, यात तीन इंजिन आहेत – पहिले 1.2 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे मॅन्युअल आणि ड्युअल क्लच ऑटोमॅटिक (DCA) ट्रान्समिशनसह येते. दुसरे 1.2 लिटर आयसीएनजी इंजिन आहे, जे 20-24 किमी/किलो मायलेज देते आणि तिसरे 1.5 लिटर डिझेल इंजिन आह, जे हाय टॉर्क परफॉर्मन्ससह 16-19 किमी/लिटर मायलेज देते. सीव्हीटी किंवा एएमटीच्या तुलनेत डीसीए ट्रान्समिशन खूपच सहज आणि उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते.
ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत ही कार बरीच प्रगत आहे, तिच्यात 6 एअरबॅग्ज स्टॅंडर्ड म्हणून उपलब्ध आहेत आणि तिला ग्लोबल एनसीएपीकडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग देखील मिळाले आहे. इतर सेफ्टी फीचर्स 360 -डिग्री कॅमेरा, ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, एक्सप्रेस कूल फंक्शन, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि सीएनजी व्हेरियंटमध्ये एक्स्ट्रा टँक प्रोटेक्शन यांचा समावेश आहे. तसेच, डीसीए ट्रान्समिशनमध्ये एक सेफ्टी लॉक फिचर देखील दिला आहे.