फोटो सौजन्य: @MoreMotorcycles (X.com)
भारतीय मार्केटमध्ये नेहमीच हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश बाईकची क्रेझ पाहायला मिळते. त्यामुळेच तर बजेट फ्रेंडली बाईकसोबतच काही दुचाकी उत्पादक कंपन्या स्टायलिश बाईक देखील ऑफर करत असतात. मार्केटमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची एक वेगळीच क्रेझ आहे. पण आता याच क्रेझला धक्का पोहचवण्यासाठी होंडाने प्रीमियम बाईक लाँच केली आहे. ही बाईक लूकपासून ते परफॉर्मन्सपर्यंत, सगळ्याच बाबतीत वरचढ ठरत आहेत. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
होंडा मोटरसायकल अँड ऑटोमोबाइल इंडिया (HMSI) ने मोठया प्रतीक्षेनंतर भारतात Rebel 500 लाँच केली आहे. या बाईकची किंमत 5.12 लाख रुपये (एक्स-शोरूम) निश्चित करण्यात आली आहे. गुरुग्राम, मुंबई आणि बेंगळुरूमधील निवडक बिगविंग टॉपलाइन डीलरशिपवर बुकिंग सुरू झाली आहे आणि जून 2025 मध्ये डिलिव्हरी सुरू होतील. ही होंडाची प्रीमियम क्रूझर बाईक आहे. भारतात ही बाईक Royal Enfield Shotgun 650, Super Meteor 650 आणि Kawasaki Eliminator 500 शी स्पर्धा करेल.
सिंगल चार्जवर 501 KM ची रेंज ! ‘या’ पॉवरफुल Electric Bike ची डिलिव्हरी सुरु
रिबेल 500 ही जगभरात लोकप्रिय आहे आणि होंडाच्या प्रीमियम मोटरसायकल पोर्टफोलिओच्या विस्ताराचा भाग म्हणून ती पहिल्यांदाच भारतात लाँच करण्यात आली आहे. ब्लॅक-आउट स्टाइलिंगसह खास रेट्रो क्रूझर डिझाइनसह, या बाईकमध्ये उंच रेक केलेले फ्युएल टॅंक, गोल एलईडी हेडलॅम्प आणि 690 मिमीची कमी सीट उंची आहे, ज्यामुळे बाईक चालवणे अधिक सोपे होते. हे सिंगल स्टँडर्ड व्हेरियंट आणि मॅट गनपाउडर ब्लॅक मेटॅलिक रंगात उपलब्ध असेल.
रिबेल 500 मध्ये 471 सीसी लिक्विड-कूल्ड पॅरलल ट्विन-सिलेंडर इंजिन आहे जे 8,500 आरपीएमवर 34 किलोवॅट आणि 6000 आरपीएमवर 43.3 एनएम टॉर्क निर्माण करते. इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे, जे मजबूत लो-एंड टॉर्क आणि रेव्ह रेंजमध्ये सहज डिलिव्हरीसाठी ट्यून केलेले आहे. यातील जाड एक्झॉस्ट क्रूझरच्या आकर्षणात भर घालते.
95 KM ची रेंज ! Suzuki च्या ‘या’ पहिल्या वाहिल्या Electric Scooter चे भारतात प्रोडक्शन सुरु
ट्यूबलर स्टील फ्रेमवर बनवलेल्या, रिबेल 500 मध्ये टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि ट्विन रियर शोवा शॉक अॅब्झॉर्बर्स आहेत. ब्रेकिंगसाठी, 296 मिमी फ्रंट आणि 240 मिमी रियर डिस्क ब्रेक सेटअप आहे आणि त्यात ड्युअल-चॅनेल एबीएसचा सपोर्ट देखील आहे. यात 16-इंच रिम्ससह क्रूझर डनलॉप टायर्स आहेत. रायडरच्या माहितीसाठी त्यात एलसीडी डिस्प्ले देखील आहे.
रिबेल 500 ही बाईक प्रत्येक होंडा शोरूममध्ये उपलब्ध नसणार आहे. ही बाईक फक्त गुरुग्राम, मुंबई आणि बेंगळुरू येथील बिगविंग टॉपलाइन डीलरशिपद्वारे विकली जाईल. होंडा बिगविंग शोरूममध्ये किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन बुकिंग करता येते.