फोटो सौजन्य: @volklub/X.com
भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या वर्षानुवर्ष Automobile मार्केटमध्ये दमदार कार ऑफर करत आहे. अशीच एक कंपनी म्हणजे Maruti Suzuki. ही ऑटो कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असते. ग्राहक देखील मारुतीच्या कारला चांगला प्रतिसाद देत आहेत.
मारुती सुझुकीने आतापर्यंत अनेक सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने एसयूव्ही सेगमेंटमध्ये Maruti Victoris लाँच केली आहे. व्हिक्टोरिस एसयूव्ही अनेक इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे. चला जाणून घेऊयात या कारचा पेट्रोल-मॅन्युअल इंजिन फुल टॅंकवर किती किलोमीटर चालवली जाऊ शकते.
Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी
मारुतीने त्यांची मिड साईझ एसयूव्ही, मारुती व्हिक्टोरिस, 3 सप्टेंबर 2025 रोजी भारतीय बाजारात सादर केली. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी याची किंमत जाहीर करण्यात आली. आता 22 सप्टेंबरपासून डिलिव्हरी सुरू झाली आहे.
मारुतीकडून या एसयूव्हीमध्ये 1.5 लिटरचे सामान्य पेट्रोल इंजिन, सीएनजी तसेच हायब्रिड तंत्रज्ञानासह विविध इंजिनांचे पर्याय देण्यात आले आहेत. कंपनीच्या मते, 1.5 लिटर पेट्रोल इंजिनमधून प्रति लिटर अंदाजे 21.18 किलोमीटरपर्यंत मायलेज मिळू शकते.
मारुती व्हिक्टोरिस एसयूव्हीमध्ये 45 लिटर क्षमतेची पेट्रोल टाकी देण्यात आली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 94.77 रुपये प्रति लिटर धरली, तर टाकी फुल करण्यासाठी सुमारे 4264 रुपयांचा खर्च येईल.
कंपनीच्या माहितीनुसार, जर ही एसयूव्ही 1 लिटर पेट्रोलमध्ये साधारण 21 किमी चालली, तर पूर्ण टाकी भरल्यावर सुमारे 945 किमीचे अंतर कापता येईल.
कंपनीने जाहीर केलेले मायलेज हे ठराविक परिस्थिती आणि निश्चित स्पीडवर आधारित असते. प्रत्यक्षात मात्र रस्त्यावरची वाहतूक, ड्रायव्हिंगची पद्धत आणि इतर घटकांवर मायलेज अवलंबून असते. त्यामुळे प्रत्यक्ष वापरात मायलेजमध्ये फरक पडू शकतो.