फोटो सौजन्य: iStock
आपली स्वतःची कार खरेदी करणं हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असतं. मात्र, आजही कार खरेदी करताना ग्राहक त्याच्या किमतीसह एका गोष्टीकडे आवर्जून लक्ष देतात. ते म्हणजे कारचा मायलेज. ग्राहक नेहमीच उत्तम मायलेज असणाऱ्या कार्सना प्राधान्य देत असतात. मात्र, कालांतराने कारचे मायलजे कमी होऊ लागते. यामुळे, कार मालकाच्या खिशाला जास्त कात्री बसते. त्यातही शहरातील कारचे मायलेज झपाट्याने कमी होत असते.
देशातील बहुतेक महानगरांमध्ये कार्यालयीन वेळेत वाहतूक कोंडी सुरू होते. त्यामुळे इंधनाचा वापर वाढतो आणि पर्यावरणाच्या हानीसोबतच खर्चही वाढतो. जर काही निष्काळजीपणामुळे तुमची कार कमी मायलेज देत असेल तर, या बातमीत, आज आपण मायलेज सुधारण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊयात.
‘या’ इलेक्ट्रिक कारने बनवला Guinness World Record, सिंगल चार्जमध्ये 1,205km धावणारी पहिली EV Car
जर तुम्हाला तुमच्या कारचा चांगला मायलेज हवा असेल, तर कारची वेळेवर सर्व्हिसिंग करणे नेहमीच आवश्यक असते. कारची सर्व्हिसिंग उशिरा झाल्यास इंजिन ऑइल खराब होते आणि ऑइल फिल्टरमध्ये बिघाड होतो, ज्यामुळे कारला जास्त क्षमतेने काम करावे लागते. यामुळे मायलेज कमी होतो. तसेच, कारच्या पार्ट्सचे नुकसान होण्याचा धोकाही वाढतो.
चांगला मायलेज मिळवण्यासाठी, कार वेगाने चालवणे टाळावे. जर कार जास्त वेगाने चालवली गेली तर जास्त पॉवरची आवश्यकता असते आणि इंजिनला जास्त क्षमतेने काम करावे लागते, ज्यामुळे इंधन कार्यक्षमता देखील वाढते.
जर कारच्या टायर्समध्ये हवेचा प्रेशर योग्य प्रमाणात असेल तर कारचा मायलेज सहज सुधारता येतो. कार चालवताना संपूर्ण भार टायर्सवर येतो. पण टायर्समध्ये हवा कमी असल्यास कारचा पिक-अप कमी होतो. अशा परिस्थितीत अॅक्सिलरेटर जास्त दाबावा लागतो आणि इंधनाचा वापरही वाढतो. त्यामुळे मायलेज कमी होतो.
Fancy Doors असणाऱ्या MG Cyberster चा पहिला रिव्ह्यू? लुकपासून ते फिचर्सपर्यंत जाणून घ्या एका क्लिकवर
जर तुम्हाला तुमच्या चांगला मायलेज हवा असेल, तर तुम्ही तुमचा प्रवास सुरू करण्यापूर्वी गुगल मॅप्सवरून कमी रहदारी असलेल्या मार्गाचा पर्याय निवडू शकता. हा पर्याय वापरल्याने तुमचा वेळ तर वाचेलच शिवाय पेट्रोल किंवा डिझेलवरील अतिरिक्त पैसेही वाचू शकतात.
बरेच लोक त्यांच्या कारमध्ये गरज नसणाऱ्या वस्तू ठेवत असतात. अशा गोष्टींमुळे कारचे वजन वाढते आणि त्यामुळे त्याचा मायलेजही कमी होतो.