फोटो सौजन्य: Pinterest
नुकतेच किया सेल्टोसचे नवीन जनरेशन कंपनीने सादर केले आहे. जी आता जास्त मोठी, अधिक आधुनिक आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम रूपात दिसणार आहे. दरम्यान, ह्युंदाई क्रेटा ही तिच्या सेगमेंटमध्ये आधीच सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही ठरली आहे. त्यामुळे, लोकांच्या मनात प्रश्न आहे की नवीन सेल्टोस चांगली आहे की क्रेटा अजूनही सर्वोच्च दर्जाची आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
नवीन किआ सेल्टोस 2026 ची किंमत 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर केली जाईल. 25000 रुपयांच्या टोकन रकमेसाठी बुकिंग आधीच सुरू झाले आहे. असा अंदाज आहे की सुरुवातीची किंमत सुमारे 11.20 लाख असू शकते. तर दुसरीकडे, ह्युंदाई क्रेटाची किंमत 10.73 लाखांपासून सुरू होते आणि 20.20 लाखांपर्यंत जाते. क्रेटा थोडी स्वस्त असू शकते, जी बजेटच्या बाबतीत ग्राहकांना आकर्षित करते.
भारतात Toyota कधी आणणार Mini Fortuner? जाणून घ्या डिझाइनपासून फीचर्सपर्यंतची माहिती
नवीन जनरेशनची किआ सेल्टोस पूर्वीपेक्षा लांब आणि रुंद आहे. याचा व्हीलबेस देखील लांब आहे, ज्यामुळे मागच्या प्रवाशांना जास्त लेगरूम मिळतो. बूट स्पेसमध्ये देखील सुधारणा झाली आहे, ज्यामुळे लांब प्रवासात सामान ठेवणे सोपे झाले आहे. जागेच्या बाबतीतही ह्युंदाई क्रेटा एक चांगली एसयूव्ही आहे, परंतु आकाराच्या बाबतीत नवीन सेल्टोस थोडीशी मागे पडते.
इंजिन पर्यायांच्या बाबतीत दोन्ही SUVs जवळपास सारख्याच आहेत. पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या पॉवर आणि परफॉर्मन्समध्ये फारसा फरक जाणवत नाही. मात्र New Kia Seltos 2026 मध्ये टर्बो पेट्रोल इंजिनसोबत नवीन क्लचलेस मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे, जो Creta मध्ये उपलब्ध नाही. तर स्पोर्टी ड्रायव्हिंग पसंत करणाऱ्यांसाठी Creta N Line मध्ये टर्बो पेट्रोल इंजिनसह मॅन्युअल गिअरबॉक्सचा पर्याय दिला जातो.
KTM 390 Adventure R लवकरच होणार लाँच! ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीसह मिळणार जबरदस्त फीचर्स
फीचर्सच्या बाबतीत दोन्ही SUVs अत्याधुनिक आहेत. New Kia Seltos 2026 मध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि हेड-अप डिस्प्ले मिळतो, ज्यामुळे ती अधिक खास ठरते. यामध्ये 10-वे पॉवर अॅडजस्ट ड्रायव्हर सीट आणि मेमरी फंक्शनही देण्यात आले आहे. Hyundai Creta मध्ये 8-वे पॉवर सीट उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये पॅनोरमिक सनरूफ, बोस साउंड सिस्टीम आणि लेव्हल-2 ADAS सारखे सेफ्टी फीचर्स मिळतात.
Hyundai Creta आणि New Kia Seltos 2026 या दोन्ही SUVs आपापल्या ठिकाणी मजबूत आणि आकर्षक पर्याय ठरतात. जर तुम्हाला नवीन डिझाइन, अधिक मोठा आकार, जास्त स्पेस आणि लेटेस्ट टेक्नॉलॉजी हवी असेल, तर New Kia Seltos 2026 तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.
दुसरीकडे, विश्वसनीयता, उत्तम परफॉर्मन्स, तुलनेने परवडणारी किंमत आणि मजबूत ब्रँड व्हॅल्यू हवी असल्यास Hyundai Creta अजूनही एक सुरक्षित आणि उत्तम निवड आहे.






