फोटो सौजन्य: @HyundaiIndia (X.com)
आपली स्वतःची कार असावी हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी अनेक जण काबाडकष्ट करत असतात. पण जेव्हा कार खरेदी करण्याची वेळ येते. कार खरेदीदार सर्वात जास्त लक्ष कारच्या किमतीवर देत असतो. अशातच एका कारची किंमत 58,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. ही कार ह्युंदाई कंपनीची आहे.
ह्युंदाईने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. यातच आता कंपनीने Hyundai i20 Automatic ची किंमत 58,000 रुपयांनी कमी केली आहे. कंपनीने मॅग्नापेक्षा कमी किमतीत i20 मॅग्ना एक्झिक्युटिव्ह देखील लाँच केली आहे आणि हाय-स्पेसिफिकेशन स्पोर्ट्झ (ओ) व्हेरियंटमध्ये अधिक फीचर्स समाविष्ट केले आहेत.
Hyundai i20 साठी CVT ऑटोमॅटिक पर्याय पूर्वी हाय-स्पेक स्पोर्ट्झ व्हेरियंट (9.46 लाख रुपये) पासून उपलब्ध होता. मॅग्ना CVT लाँच झाल्यानंतर हीच किंमत 8.89 लाखांवर आली आहे. मॅग्ना मॅन्युअल व्हेरियंटमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सव्यतिरिक्त, ऑटोमॅटिकमध्ये सनरूफ यात दिले गेले आहे.
फक्त भारतात नाही तर जगभरात EVs चा डंका ! येत्या काळात पेट्रोल-डिझेलच्या कार नाहीसे होणार?
फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध असलेली, i20 मॅग्ना एक्झिक्युटिव्हची किंमत मॅग्ना एमटी व्हेरियंटपेक्षा 27,000 रुपये कमी आहे. किमतीत फरक असूनही, नवीन व्हेरियंटमध्ये i20 मॅग्ना सारखीच फीचर्स आहेत, कारण कंपनी प्रीमियम हॅचबॅक अधिक सुलभ बनवण्याचा विचार करत आहे. ह्युंदाई इंडियाचे सीओओ तरुण गर्ग म्हणतात की, “मॅग्ना एक्झिक्युटिव्ह व्हेरियंटच्या लाँचिंगसह, आम्ही ग्राहकांसाठी i20 अनुभव अधिक सुलभ आणि इच्छित बनवण्याचे उद्दिष्ट ठेवतो.”
Tata च्या ‘या’ व्हॅनचा सगळीकडेच बोलबाला ! एक-दोन नव्हे तर 20 जणं आरामात बसतील, किंमत 7 लाख रुपये
ह्युंदाईने i20 Sportz(O) व्हेरियंटमध्ये अधिक फीचर्स समाविष्ट केले आहेत. कीलेस एंट्री अँड गो, व्हॉइस-सक्षम सनरूफ आणि 7-स्पीकर बोस ऑडिओ सिस्टम सारख्या किटसह, ह्युंदाई आय20 स्पोर्ट्झ (ओ) च्या किंमती 26,000 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत.
शिवाय, कोरियन ब्रँड संपूर्ण आय20 रेंजवर 14,999 रुपयांमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसह 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि पर्यायी अतिरिक्त म्हणून रिअर कॅमेरा देत आहे. या ॲक्सेसरीज 3 वर्षांच्या वॉरंटीसह येतात.