फोटो सौजन्य: @flaneurUK (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केट हे टाटा मोटर्सशिवाय अपूर्णच. टाटा मोटर्सने देशात विविध सेगमेंटमध्ये उत्तम आणि बेस्ट वाहनं ऑफर केली आहेत. सध्या कंपनी इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. पण कंपनीने पॅसेंजर व्हेईकल सोबतच कमर्शियल व्हेईकलमध्ये सुद्धा उत्तम वाहनं ऑफर करते. कंपनीच्या अशाच एका बेस्ट व्हॅनबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
फॅमिली ट्रिपसाठी बरेच लोकं 7 सीटर एसयूव्हीच्या शोधात असतात. अनेक जणांची कुटुंबे 7 लोकांपेक्षा मोठी असतात. अशा परिस्थितीत, संपूर्ण कुटुंबासह वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहते. जर तुम्हालाही संपूर्ण कुटुंबासह प्रवास करायचा असेल आणि तुमच्या काही नातेवाईकांना सोबत घेऊन जायचे असेल, तर आज आपण अशा एका बेस्ट वाहनाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एका वेळी 20 जणं आरामात बसू शकतात. ज्याची किंमत फक्त 7 ते 7.50 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. यात एसी सुविधा देखील आहे. चला Tata Winger Van बद्दल जाणून घेऊयात.
टाटाची ही 20 सीटर व्हॅन खूप स्वस्त आहे. या व्हॅनमध्ये तुम्हाला 20 जणांना एकत्र बसण्यासाठी जागा मिळते आणि त्यासोबतच तुम्हाला अनेक उत्तम सुविधाही मिळतात. टाटा विंगर व्हॅनच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, त्याची सुरुवातीची किंमत 7 लाख 20 हजार रुपयांपासून सुरू होते आणि त्याच्या टॉप व्हेरियंटची किंमत 7 लाख 56 हजार रुपयांपर्यंत जाते.
इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये Royal Enfield ची एंट्री होणार ! ‘या’ महिन्यात लाँच होण्याची दाट शक्यता
Tata Winger मध्ये डिझेल इंजिन दिले आहे, जे त्याला प्रचंड पॉवर देते. आता Tata Winger देखील BS6 इंजिनसह येते, ज्यामुळे ही व्हॅन कमी प्रदूषण करते. या व्हॅनमध्ये 2.2 लिटर डायकोर इंजिन आहे, जे तिला उत्कृष्ट मायलेज आणि पॉवर देते.
या व्हॅनमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक, एबीएस सिस्टम, 5 गिअर बॉक्स दिले आहेत, जे या व्हॅनला उत्तम स्पीड आणि मायलेज देतात. जर तुमची टूर आणि ट्रॅव्हल एजन्सी असेल किंवा तुमचे कुटुंब मोठे असेल आणि तुम्ही त्यानुसार व्हॅन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर Tata Winger तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय असू शकते.