फोटो सौजन्य: Pinterest
देशाची सर्वात मोठी आणि आघाडीची ऑटो कंपनी Maruti Suzuki ने मार्च 2026 मध्ये डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे. कंपनी Arena Dealership द्वारे विकल्या जाणाऱ्या प्रमुख मॉडेल्सवर 50000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत. कंपनी नेक्सा आणि एरिना या दोन डीलरशिपद्वारे त्यांच्या कार्स विकते. या डीलरशिपवर ब्रेझा, वफगानी आणि मारुती सुझुकी स्विफ्ट सारख्या कार्स उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊयात, कोणत्या वाहनांवर डिस्काउंट मिळत आहे.
एर्टिगा ही देशातील सर्वात लोकप्रिय 7-सीटर फॅमिली कारपैकी एक आहे. या एमपीव्हीवर 5000 रुपयांपर्यंत बचत करता येईल. एर्टिगाची सुरुवातीची किंमत 8.80 लाख (एक्स-शोरूम) ते 12.94 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपर्यंत आहे. ग्राहकांसाठी ही एक उत्तम ऑफर आहे.
Maruti Suzuki Dzire या कारवर सुमारे 2,500 रुपयांपर्यंत बचत करता येऊ शकते. ही देशातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट सेडान कारपैकी एक असून 2025 मध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या कार्समध्येही याचा समावेश होता. किमतीबाबत बोलायचे झाल्यास, या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 6.26 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंटची किंमत 9.31 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
ही देशातील सर्वात लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV पैकी एक आहे. या SUV चे नवे फेसलिफ्ट मॉडेल लवकरच भारतीय बाजारात लाँच होण्याची शक्यता आहे. मार्च 2026 मध्ये Brezza वर 45,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. ही ऑफर जवळपास सर्व व्हेरिएंट्सवर उपलब्ध आहे, मात्र LXI व्हेरिएंटवर या महिन्यात सुमारे 10,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
Hero Glamour 125 vs Honda Shine 125: इंजिन, किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती बाईक पुढे?
Eeco ही कार पेट्रोल आणि CNG अशा दोन्ही व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. मार्च 2026 मध्ये या दोन्ही व्हेरिएंट्सवर जास्तीत जास्त 42,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. Eeco चा वापर मोठ्या प्रमाणात अॅम्ब्युलन्स आणि व्हॅन म्हणून केला जातो. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.21 लाख रुपयांपासून सुरू होऊन 6.36 लाख रुपयांपर्यंत जाते.
Maruti Suzuki Celerio वर मार्च 2026 मध्ये जास्तीतजास्त 42,500 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. भारतीय बाजारात या कारची एक्स-शोरूम किंमत सुमारे 4.70 लाख रुपयांपासून सुरू होऊन 6.73 लाख रुपयांपर्यंत आहे.
या महिन्यात, स्विफ्टवर 50000 रुपये , वॅगन आरवर 42500 रुपये आणि मारुती सुझुकी व्हिकटोरीसवर 40000 रुपयांची सूट मिळेल. विशेष म्हणजे, या महिन्यात एसयूव्हीच्या सीएनजी आणि पेट्रोल व्हेरिएंटवर कमी सूट मिळत आहे.






