फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच आता अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक दमदार फीचर्ससह लाँच करत आहे. ग्राहक देखील आता या वाहनांना आपला चांगला प्रतिसाद दर्शवत आहे. टू व्हीलर सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर खूप लोकप्रिय झाले आहेत.
पेट्रोलच्या किमती वाढत असल्याने लोक इलेक्ट्रिक दुचाकींकडे आकर्षित होत आहेत. अलीकडील इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये फिक्स बॅटरी आणि रिमूव्हेबल बॅटरी असतात. अशावेळी, लोकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की या दोघांपैकी कोणते बॅटरी असणारी स्कूटर खरेदी करणे त्यांच्यासाठी योग्य? चला या प्रश्नाचे आज उत्तर जाणून घेऊया.
फिक्स बॅटरी म्हणजे बॅटरी स्कूटरच्या चेसिसशी कायमची जोडलेली असते आणि तुम्ही ती स्वतः काढू शकत नाही. या बॅटरी सामान्यतः स्कूटरचा तोल आणि जागा सुधारण्यासाठी वापरल्या जातात.
देशातील सर्वात स्वस्त EV झाली अजूनच स्वस्त, आता किंमत असेल फक्त…
ही बॅटरी लिथियम-आयन टेक्नॉलॉजीवर आधारित आहेत, जी हलकी असण्यासोबतच तिचे आयुष्य जास्त आहे. यात चांगले सिस्टम इंटिग्रेशन आहे, जे मोटर, बीएमएस आणि कंट्रोलरमध्ये चांगले समन्वय सुनिश्चित करते.
यामध्ये थर्मल मॅनेजमेंट चांगले असते कारण बॅटरी चांगल्या प्रकारे बंद असते.
Ertiga किंवा Innova खरेदी करण्यात नका करू घाई ! May 2025 मध्ये ‘ही’ 7 सीटर कार करणार धमाका
फिक्स बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरचा एकच तोटा आहे तो म्हणजे ही स्कूटर चार्जिंगसाठी चार्जिंग पॉईंटवर न्यावी लागते.
ज्या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये रिमूव्हेबल आहे त्यांची बॅटरी तुम्ही काढून घरी किंवा ऑफिसमध्ये चार्ज करू शकता. ज्यांच्याकडे स्थिर बॅटरीने स्कूटर चार्ज करण्यासाठी जागा किंवा सुविधा नाही त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर आहे.
काही वाहन उत्पादक कंपन्या बॅटरी-स्वॅपिंग नेटवर्क देखील तयार करत आहेत, ज्यामुळे तुम्ही जुनी बॅटरी देऊन चार्ज बॅटरी देऊ शकता.
तुम्ही ही बॅटरी कुठेही चार्ज करू शकता, मग ते घर असो, ऑफिस असो किंवा दुकान असो.
उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात ही बॅटरी सुरक्षित ठिकाणी चार्ज करता येतात.
ही बॅटरी रिप्लेस किंवा स्वपिंग करणे आता पूर्वीपेक्षा सोपे झाले आहे.
बॅटरी कनेक्टर वारंवार काढून टाकल्याने ते सैल होण्याचा धोका असतो.
ही बॅटरी चोरीला जाण्याचा किंवा खराब होण्याचा धोका असतो.
जर तुम्ही तळमजल्यावर किंवा स्वतःच्या घरात राहत असाल आणि तुमच्याकडे पर्सनल चार्जिंग पॉइंट असेल, तर तुमच्यासाठी फिस्क फिक्स बॅटरी असलेली स्कूटर चांगली असू शकते.
जर तुम्ही अपार्टमेंटमध्ये राहत असाल किंवा ऑफिसमध्ये काम करताना स्कूटर चार्ज करू इच्छित असाल, तर रिमूव्हेबल बॅटरी असलेली स्कूटर तुमच्यासाठी सर्वोत्तम असू शकते.
जर तुम्ही दररोज 40-60 किमी प्रवास करत असाल तर दोन्ही पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.