फोटो सौजन्य: @HyundaiUAE/X,com
भारतीय बाजारात कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर होत असतात. ग्राहकांचा देखील या वाहनांना चांगला पाठिंबा मिळतो. याच सेगमेंटमध्ये आता Hyundai कंपनी नवीन कार लाँच करण्याची तयारी करत आहे.
कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये व्हेन्यूचे एन लाईन व्हर्जन देखील उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या एसयूव्हीच्या नवीन जनरेशनच्या लाँचिंगची तयारी सुरू झाली आहे. नुकतेच ही कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. चला जाणून घेऊयात, टेस्टिंग दरम्यान आढळलेल्या या कारमधून कोणती माहिती मिळाली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, Hyundai व्हेन्यूची नवीन जनरेशन लाँच करण्याची तयारी करत आहे. यासोबतच, याच्या एन लाईन व्हेरिएंटची एक नवीन जा जनरेशन देखील लाँच केली जाईल. लाँच होण्यापूर्वी सध्या त्याची टेस्टिंग सुरू आहे.
Triumph ची 350cc बाईक होऊ शकते लाँच, GST 2.0 नंतर किंमत होणार कमी?
रिपोर्ट्सनुसार टेस्टिंगदरम्यान वेन्यू N लाईनला लाँच होण्यापूर्वी स्पॉट झाली आहे. यावेळी याच्या रियर प्रोफाईल आणि काही फीचर्सची माहिती समोर आली आहे. या SUV च्या मागील भागात LED आणि पातळ टेल लाइट्स, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर, ड्युअल एग्झॉस्ट असे फीचर्स दिलेले दिसतात. तर पुढील भागात कनेक्टेड LED DRL आणि LED हेडलाइट्स असतील. याचा नवीन डिझाइन विद्यमान क्रेटा N लाईनवरून प्रेरित आहे.
कंपनीकडून यात सध्याचेच इंजिन देण्यात येणार आहे. यात 1-लीटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन असेल, ज्यातून 120 PS ची पॉवर आणि 172.7 Nm टॉर्क निर्माण होईल. यासोबत 6-स्पीड DCT आणि मॅन्युअल ट्रान्समिशनचे पर्यायही उपलब्ध असतील.
नवीन पिढीच्या एसयूव्हीमध्ये ऑटोमॅटिक प्रोजेक्टर एलईडी हेडलाइट्स, एलईडी डीआरएल, कनेक्टेड एलईडी टेललाईट्स, 16-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स, रूफ रेल, रूफ-माउंटेड स्पॉयलर, ब्लॅक लेदरेट सीट अपहोल्स्ट्री, लेदर-रॅप्ड स्टीअरिंग व्हील आणि गियर लीव्हर, मेटल पेडल्स, स्टोरेज स्पेससह फ्रंट सेंटर आर्मरेस्ट, कपहोल्डर्ससह रिअर सेंटर आर्मरेस्ट, सर्व प्रवाशांसाठी ॲडजस्टेबल हेडरेस्ट, कलरफुल मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले (एमआयडी) असलेला सेमी-डिजिटल ड्रायव्हर्स डिस्प्ले, सिंगल-पेन सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, पॅडल शिफ्टर्स, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, रिअर व्हेंट्ससह ऑटो एसी, आणि असे फीचर्स पाहायला मिळतील.
कंपनीने अद्याप अधिकृतपणे ही तारीख जाहीर केलेली नाही. मात्र, ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2025 दरम्यान व्हेन्यूच्या नवीन जनरेशनसोबत लाँच होण्याची अपेक्षा आहे.