फोटो सौजन्य: iStock
मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय बाजारात ट्रायम्फ एक नवीन बाईक लाँच करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्सनुसार, ही नवीन बाईक 350 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केली जाऊ शकते. मात्र, कंपनीने अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही.
BPCL च्या मॅक लुब्रिकंट्सद्वारे देशव्यापी रेडिओ मोहिमेत मेकॅनिक कम्युनिटीचा सन्मान
ट्रायम्फच्या नवीन बाईक सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे ती 350 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केली जाणार आहे. त्यामुळे ट्रायम्फची बाईक तुलनेने स्वस्त होईल आणि कंपनीला जीएसटी 2.0 चा थेट फायदा मिळेल.
कंपनीकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही की 350 सीसी सेगमेंटमधील नवी बाईक आल्यानंतर सध्याच्या 400 सीसी मॉडेलची विक्री थांबवली जाईल की नाही. मात्र, ट्रायम्फकडून सध्याचे मॉडेल बंद करण्याची शक्यता कमी आहे. उलट या बाईकच्या निर्यातीवर लक्ष दिले जाऊ शकते. कारण जीएसटीतील बदलामुळे 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या बाईकची किंमत वाढणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रायम्फची नवीन ही नवीन बाईक पुढील वर्षी भारतात लाँच होण्याची शकयता आहे.
जेव्हा ट्रायम्फची नवीन बाईक 350 सीसी सेगमेंटमध्ये लाँच केली जाईल, तेव्हा ही Royal Enfield, Honda आणि Yezdi सारख्या बाईक उत्पादकांच्या बाईकसोबत थेट स्पर्धा करेल.






