फोटो सौजन्य: iStock
भारतात आजही कार खरेदी ही एक मोठी आणि आनंदाची गोष्ट मानली जाते. आपली ड्रीम कार खरेदी करता यावी हे प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते. याच स्वप्नाच्या पूर्ततेसाठी अनेक जण वर्षानुवर्ष बजेट प्लनिंग करत असतात. मात्र, जेव्हा कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होते तेव्हा समजतं की वाहन खरेदी करण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे कठीण असते.
कारमध्ये अनेक महत्वाचे पार्ट असतात. त्यातीलच एक महत्वाचा पार्ट म्हणजे कार स्टेअरिंग ज्यामुळे कार खऱ्या अर्थाने कार नीट धावत असतात. बऱ्याचदा, कारमधील छोट्याशा निष्काळजीपणामुळे त्यात अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. अशीच एक समस्या म्हणजे स्टेअरिंगमधील व्हायब्रेशन. चला जाणून घेऊयात, कोणत्या प्रकारच्या निष्काळजीपणामुळे कारचे स्टेअरिंग व्हायब्रेट होते.
15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI
जेव्हा कार खराब रस्त्यांवर बराच वेळ धावते, तेव्हा कारच्या सस्पेंशन समस्यांचा धोका वाढतो. एकदा सस्पेंशनमध्ये खराबी आली की, कार चालवताना स्टेअरिंग व्हायब्रेट होऊ लागते. जर ही समस्या वेळेवर दुरुस्त केली गेली नाही तर कारमधील इतर समस्यांचा धोका वाढतो.
कार चालवण्याची योग्य पद्धत खूप कमी लोकांना माहिती असते. बहुतेक लोकं ब्रेक लावताना खूप जोरात ब्रेक लावतात. परिणामी कारचा ब्रेक रोटर खराब होतो. ब्रेक रोटर खराब झाला की कार चालवताना स्टेअरिंग व्हायब्रेट होऊ लागते. ब्रेक रोटर आणि ब्रेक पॅड मिळून कार थांबवतात किंवा तिचा वेग कमी करतात. पण जेव्हा ते खराब होतात तेव्हा स्टीअरिंग व्हायब्रेट होऊ लागते.
Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan
कारच्या स्टेअरिंगमधील व्हायब्रेशन दूर ठेवण्यासाठी, अलाइनमेंट योग्य असणे देखील महत्वाचे आहे. जेव्हा कारच्या व्हीलचे अलाइनमेंट आऊट असते, तेव्हा कार चालवताना स्टेअरिंगमध्ये व्हायब्रेशनची समस्या उद्भवते. जेव्हा असे होते तेव्हा कार एकाच दिशेने जाऊ लागते. यासोबतच व्हायब्रेशन सुद्धा जाणवू लागते. हे टाळण्यासाठी, वेळोवेळी कारचे अलाइनमेंट तपासले पाहिजे. असे केल्याने, स्टेअरिंगमधील व्हायब्रेशनची समस्या दूर ठेवता येते.
जर कार चालवताना निष्काळजीपणा दाखवला गेला आणि ती खराब रस्त्यांवर बराच वेळ चालवली गेली, तर खराब ड्रायव्हिंग पॅटर्नसह, स्टेअरिंगमध्ये व्हायब्रेशनचा धोका देखील वाढतो. यासोबतच, हवामानात जास्तच बदल झाल्यामुळेही असे होऊ लागते.