Jawa Yezdi मोटरसायकलने लाँच केली ‘Yezdi अॅडव्हेंचर' 2025 एडिशन, प्रत्येक आव्हानासाठी सुसज्ज अशी डिझाइन आणि ही आहेत वैशिष्ट्ये
जावा येझदी मोटरसायकलने भारतातील पुरस्कार-प्राप्त अॅडव्हेंचर टूरर ‘Yezdi अॅडव्हेंचर’ २०२५ एडिशन लाँच केले आहे. ‘भारतातील, अॅडव्हेंचर मानसिकता’ या साध्या तत्वावर ही मोटरसायकल आधारित आहे. शहरातील दैनंदिन वाहतूकीच्या वर्दळीमधून नेव्हिगेट करण्यासह खडतर प्रदेशांमध्ये सहजपणे राइड करण्याचे स्वप्न असलेल्या राइडर्ससाठी ही ही मोटरसायकल डिझाइन करण्यात आली आहे.
जपानच्या रस्त्यांवर धावणार भारतातील Made In India इलेक्ट्रिक कार, मिळेल 500KM रेंज
२०२५ येझदी अॅडव्हेंचरमध्ये क्लासिक-एडीव्ही स्टायलिंगसह लक्षवेधक ट्विन एलईडी हेडलाइट्स आणि विशिष्ट रॅली-प्रेरित दर्शनी भाग आहे, ज्यासह ही मोटरसायकल रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेते. या मोटरसायकलमधील फ्यूएल टँक येझदीचा अॅडव्हेंचर-टूरिंग वारसा कायम ठेवते. मोटरसायकलचे शहरी-केंद्रित स्टान्स क्षमतेची खात्री देते आणि मोटरसायकलच्या सिल्हूटमधून प्रबळता व स्थिरता निदर्शनास येते. (फोटो सौजन्य – Jawa Yezdi)
नवीन २०२५ येझदी अॅडव्हेंचरच्या आकर्षकतेला पूरक असं ऑल-डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर आहे. या मोटरसायकलमध्ये व्यावहारिक व वापरण्यायोग्य तंत्रज्ञान आहे, जसे विविध प्रदेशांसाठी स्विचेबल एबीएस, आत्मविश्वासाने राइडिंगसाठी ट्रॅक्शन कंट्रोल आणि विविध राइडिंग स्थितींमध्ये आरामदायीपणासाठी अॅडजस्टेबल विंडस्क्रिन व इन्स्ट्रूमेंट कंसोल, अशा तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही मोटारसायकल रायडिंगसाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहे.
भारतात महामार्गांवर, पावसाचे पाणी साचलेल्या रस्त्यांवर आणि सर्वत्र राइडर्स साहसी राइडिंगचा आनंद घेताना पाहायला मिळू शकते. २०२५ येझदी अॅडव्हेंचरचे अल्फा२ लिक्विड-कूल्ड इंजिन शक्तिशाली लो-एण्ड टॉर्क आणि भारतातील खड्डे असलेल्या किंवा खुल्या रस्त्यांवर विश्वसनीय परफॉर्मन्ससाठी परिपूर्ण आहे. या मोटरसायकलमधील सेंट्रल एक्झॉस्ट रूटिंग वाहतूकीच्या वर्दळीमध्ये आणि महामार्गावर सानुकूल उष्णता व्यवस्थापनाची खात्री देते. तसेच दर्जात्मक ग्राऊंड क्लीअरन्स गतिरोधक, खड्डे असलेले रस्ते ते खडतर रस्त्यांवरील अडथळ्यांना आत्मविश्वासाने पार करते.
येझदी २०२५ अॅडव्हेंचर व्यावहारिकतेसह खरेदीदारांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करते, जे भारतातील साहसी टूरिंगला नव्या उंचीवर घेऊन जातात. मोटरसायकलच्या सर्वोत्तम एर्गोनॉमिक्समध्ये भारतभरातील टूरिंगसाठी डिझाइन करण्यात आले आहे. या मोटरसायकलमधील सर्वोत्तम इलेक्ट्रॉनिक्स कंसोल भारतातील नवीन व अनुभवी राइडर्ससाठी साहसी राइडिंगचा आनंद घेणे सोपे करते.
“वर्षातील पुरस्कार-प्राप्त अॅडव्हेंचर टूरर तुमच्याकडे असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही निश्चितच मोटरसायकलच्या मर्यादांना दूर कराल,” असे जावा येझदी मोटरसायकल्सचे सह-संस्थापक अनुपम थरेजा म्हणाले. “आम्ही भारतातील सर्वोत्तम अॅडव्हेंचर टूरिंग मोटरसायकल डिझाइन केली आहे आणि आम्ही ते आमच्या सिग्नेचर स्टाइलसह केले – इट्स ए क्लासिक, इट्स ए येझदी. भारतातील साहसी बाइकर्स याच मोटरसायकलची वाट पाहत होते, जिच्यामध्ये डिझाइन, तंत्रज्ञान आणि भारतातील रस्त्यांसाठी डिझाइन करण्यात आलेली कार्यक्षमता यांचे योग्य संयोजन आहे. ही मोटरसायकल भारतातील राइडर्सच्या सकाळच्या वेळी वाहतूकीची वर्दळ ते वीकेण्डला राइडचा आनंद घेण्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी योग्य ठरणार आहे, तसेच साहसी राइडचा आनंद घेण्याच्या महत्त्वाकांक्षेची पूर्तता करते.”
२०२५ येझदी अॅडव्हेंचरमध्ये रस्त्यावर सर्वांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ट्वीन एलईडी हेडलाइट्स व टेल-लाइट्स आणि अंधारमय रस्त्यांसाठी इल्यूमिनेशन आहे. प्रोप्रायटरी ३३४ सीसी अल्फा२ लिक्विड-कूल्ड इंजिन २९.६ पीएस शक्ती आणि २९.९ एनएम टॉर्कसह सानुकूल कार्यक्षमता देते. हे इंजिन लांबच्या प्रवासासाठी, तसेच वाहतूकीमध्ये नेव्हिगेट करण्यासाठी अनुकूल आहे. लांबच्या अंतरासाठी मोठे १५.५-लीटर फ्यूएल टँक आणि नवीन बॅश प्लेट या मोटरसायकलला भारतातील सर्व रस्त्यांसाठी सुसज्ज करते.
627 KM रेंजसह दमदार फीचर्स ! अखेर भारतात Tata Harrier EV झाली लाँच
सानुकूल उष्णता व्यवस्थापनासाठी सेंट्रल एक्झॉस्ट रूटिंग, उंच २२० मिमी ग्राऊंड क्लीअरन्स, सर्वोत्तम नियंत्रणासाठी विभागातील सर्वात कमी ८१५ मिमी सीट उंची आणि टूरिंग-केंद्रित राइडर ट्रायंगल ही सर्व वैशिष्ट्ये राइडरला उच्च दर्जाचा आरामदायीपणा देतात. राइडर नियंत्रण सेगमेंट-फर्स्ट ट्रॅक्शन कंट्रोलसह अधिक दृढ करण्यात आले आहे, ज्यामध्ये तीन एबीएस मोड्स (रोड, रेन व ऑफ-रोड) आहेत. टूरिंग टेक श्रेणीमध्ये अॅडजस्टेबल विंडशील्ड आणि सीटेड व स्टॅण्डिंग राइडिंग पोझीशन्ससाठी सानुकूल इन्स्ट्रूमेंट कंसोल, एकीकृत ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटीसह टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि लांबच्या प्रवासादरम्यान डिवाइसेसना चार्ज करण्यासाठी यूएसबी चार्जिंग आहे.
प्रत्येक सिग्नेचर घटक मोठ्या प्रमाणात समरूप श्रेणीमध्ये ‘चाओज बाय डिझाइन’ची निर्मिती करतात. ही अस्सल, वारसामधून निर्माण करण्यात आलेली आणि कंपनीची क्लासिक-स्टाइल एडीव्ही आहे, जी समकालीन क्लासिक्समध्ये अग्रस्थानी आहे. सेगमेंट-फर्स्ट ट्विन हेडलाइट्स व ट्विन-पॉड टेललाइट्स, रॅली-स्टाइल दर्शनी भाग आणि शक्तिशाली एक्सोस्केलेटन लक्षवेधक व आकर्षक लुकची खात्री देतात. सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या प्रत्येक व्हेरिअंटमध्ये नवीन ग्राफिक एलीमेण्ट्स आहेत, जे मोटरसायकलच्या सर्व प्रदेशांमध्ये राइडिंग करण्याच्या क्षमतेला अधिक दृढ करतात.
२०२५ येझदी अॅडव्हेंचर सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे:
टेस्ट राइड्स आणि बुकिंग्जना देशभरातील सर्व जावा येझदी मोटरसायकल्स डिलरशिप्समध्ये ४ जून २०२५ पासून सुरूवात होईल.