फोटो सौजन्य: Social Media
दिवसेंदिवस ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक उत्तम आणि अत्याधुनिक वाहनं लाँच होताना दिसत आहे. ऑटो कंपनीज ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार कार्स डिझाइन करत आहे. काही वेळेस आपल्या दमदार कार्स मार्केटमध्ये लाँच करण्यापूर्वी कंपनी त्या एका कार्यक्रमात त्याची झलक दाखवत असतात.
आपल्या देशात एक असा देखील कार्यक्रम होतो, ज्यात स्वदेशी आणि विदेशी कंपनीज भाग घेऊन आपल्या आगामी वाहनांचे प्रदर्शन करत असतात. या कार्यक्रमाचे नाव म्हणजे Bharat Mobility Global Expo 2025. चला जाणून घेऊया, जानेवारी 2025 मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये कोणत्या कंपन्या सहभागी होतील.
वर्षाअखेरीस EV खरेदी करणे झाले स्वस्त, ‘या’ कंपनीज देत आहे आतापर्यंतचे बेस्ट डिस्काउंट
आगामी ऑटो एक्स्पोमध्ये 34 वाहन निर्माते सहभागी होणार आहेत, ही 1986 मधील प्रीमियर इव्हेंटच्या पहिल्या कार्यक्रमानंतरची सर्वाधिक संख्या आहे. ACMA आणि CII च्या भागीदारीत सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) भारत मंडपम येथे 17-22 जानेवारी दरम्यान इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये ऑटो एक्स्पो ‘द मोटर शो’ च्या 17 व्या आवृत्तीचे आयोजन होईल.
सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी पीटीआयला सांगितले की सुमारे 34 वाहन निर्माते या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत आणि अनेक पॉवरट्रेनशी संबंधित तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करतील. या स्पर्धेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक सहभाग असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या वाहन उत्पादकांमध्ये टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, टोयोटा किर्लोस्कर मोटर, ह्युंदाई मोटर इंडिया, किया मोटर इंडिया, जेएसडब्ल्यू एमजी मोटर आणि स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया यांचा समावेश आहे.
BMW, Mercedes, Porsche India आणि BYD सारख्या लक्झरी कार उत्पादक कंपन्या देखील या कार्यक्रमादरम्यान त्यांची उत्पादने प्रदर्शित करतील. दुचाकी विभागात TVS मोटर कंपनी, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया, सुझुकी मोटरसायकल आणि इंडिया यामाहा यांचा सहभाग दिसेल. त्याचप्रमाणे व्होल्वो आयशर कमर्शिअल व्हेइकल्स, अशोक लेलँड, जेबीएम आणि कमिन्स इंडिया देखील या उपक्रमात सहभागी होणार आहेत.
मेनन पुढे म्हणाले की, एथर एनर्जी, टीआय क्लीन मोबिलिटी, एका मोबिलिटी, ओला इलेक्ट्रिक आणि विनफास्ट सारख्या काही बेस्ट ईव्ही कंपन्या देखील ऑटो एक्सपोमध्ये सहभागी होतील.
इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 पुढील वर्षी 17 ते 22 जानेवारी दरम्यान भारत मंडपम, यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्सपो सेंटर) द्वारका आणि इंडिया एक्स्पो सेंटर अँड मार्ट, ग्रेटर नोएडा येथे एकाच वेळी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल. मागील वर्षी 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले होते.