फोटो सौजन्य: Gemini
वाहन निर्माता Kia Corporation भारतात विविध सेगमेंटमध्ये आपली उपस्थिती मजबूत करत आहे. आता कंपनीकडून भारतीय बाजारासाठी हायब्रिड तंत्रज्ञानासह नवीन गाड्या आणण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किआ भविष्यात पर्यावरणपूरक आणि इंधन कार्यक्षम वाहनांवर अधिक भर देणार असून हायब्रिड सेगमेंटमध्ये मोठी एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे.
रिपोर्ट्सनुसार, किआ भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन हायब्रिड तंत्रज्ञान असलेल्या गाड्या सादर करण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवरचा कॉम्बिनेशन असलेली हे तंत्रज्ञान इंधन बचत आणि कमी प्रदूषणासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे भारतासारख्या मोठ्या बाजारात याची मागणी वाढण्याची शक्यता आहे.
Mahindra च्या ‘या’ लोकप्रिय कारच्या किमतीत अव्वा का सव्वा वाढ! आता द्यावी लागणार इतकी किंमत
मिळालेल्या माहितीनुसार, किआ सर्वप्रथम Kia Carnival आणि Kia Sorento या दोन मॉडेल्समध्ये हायब्रिड तंत्रज्ञान सादर करू शकते. Kia Carnival ही गाडी आधीपासूनच भारतात उपलब्ध आहे आणि प्रीमियम MPV सेगमेंटमध्ये लोकप्रिय आहे. तर Kia Sorento ही SUV लवकरच भारतीय बाजारात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कंपनीकडून या दोन्ही गाड्या 2030 पर्यंत भारतात अधिकृतपणे हायब्रिड तंत्रज्ञानासह लॉन्च केल्या जाऊ शकतात. यामुळे किआला भारतीय ऑटोमोबाईल बाजारात पर्यावरणपूरक वाहनांच्या श्रेणीत मजबूत स्थान मिळवता येईल.
रिपोर्ट्सनुसार, या हायब्रिड गाड्यांमध्ये 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल-हायब्रिड इंजिन दिले जाऊ शकते. यासोबत मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भारतासाठी नेमक्या इंजिन स्पेसिफिकेशन्सबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे किआ या हायब्रिड गाड्यांचे उत्पादन भारतातच करण्याची योजना आखत आहे. 2030 पर्यंत कंपनीने वार्षिक सुमारे 4.5 लाख युनिट्स विक्रीचे लक्ष्य ठेवले आहे. यासोबतच भारतीय बाजारात सुमारे 7.6 टक्के मार्केट शेअर मिळवण्याचेही उद्दिष्ट कंपनीसमोर आहे.






