फोटो सौजन्य: iStock
भारतात नेहमीच होळी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत असते. प्रत्येक जण वेगवेगळ्या रंगात रंगलेला असतो. एकदा रंग लावून झाले की अनेक जण बाहेर फेरफटका मारण्यासाठी सज्ज होतात. यातही अनेक जण आपली बाईक, स्कूटर किंवा कारने फिरण्यास प्राधान्य देतात. पण होळीच्या सेलिब्रेशनमध्ये अनेक जण वाहतुकीचे नियम सर्रास मोडताना दिसतात. अशावेळी ट्राफिक पोलिस देखील उत्साही चालकांना फाइन मारत असतात. देशातील अनेक राज्यातील लोकांनी होळीचे सेलिब्रेशन करताना वाहतुकीचे नियम मोडले आहेत. यात दिल्लीकर सुद्धा मागे नाहीत.
आपण सर्वेच जाणतो की वाहतुकीचे नियम पाळणे हे महत्त्वाचे आहे. हे नियम लोकांच्या सुरक्षिततेसाठी बनवले गेले आहेत. कोणताही सण असो, वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत. पण दिल्लीत होळी सणाच्या निमित्ताने हजारो लोकांनी वाहतूक नियमांचे पालन केले नाही, त्यामुळे पोलिसांनी सात हजारांहून अधिक वाहनांना फाइन मारला आहे. 2024 मध्ये 3,589 वाहनांसाठी चलान जारी करण्यात आले. या वर्षी ही संख्या 7,230 वर पोहोचली आहे.
भारतात 4 लाखात मिळणारी कार पाकिस्तानात 23 लाखात मिळतेय, जाणून घ्या Swift, Wagon R ची किंमत
दिल्ली वाहतूक पोलिसांच्या अधिकृत निवेदनानुसार, होळीच्या दिवशी मद्यपान करून गाडी चालवण्याचे 1,213 गुन्हे नोंदवले गेले. तर 2024 मध्ये ही संख्या 824 होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणाऱ्यांची संख्याही 56 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 मध्ये 1,524 दुचाकीस्वार हेल्मेटशिवाय पकडले गेले. तर 2025 मध्ये हा आकडा 2,376 वर पोहोचला.
देशाची राजधानी दिल्लीमध्ये लोकांच्या सुरक्षेसाठी होळीच्या दिवशी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. यासाठी, दिल्ली वाहतूक पोलिसांनी 84 विशेष पथके तैनात केली, ज्यांना मद्यधुंद चालकांची चाचणी करण्यासाठी अल्कोमीटर देखील देण्यात आले. यासोबतच, 40 जॉईंट चेकिंग पथके तयार करण्यात आली, जी राजधानीतील वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने सर्व नियमांचे योग्य पालन होत आहे की नाही यावर लक्ष ठेवत होती.
वाहनांचे Engine Oil सुद्धा एक्सपायर होते का? वेळेतच घ्या बदलून अन्यथा बसेल हजारोंचा फटका
ही पथके दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तैनात करण्यात आली होती, जी होळीच्या दिवशी सकाळी 8 ते मध्यरात्रीपर्यंत तपासणी करत होती. दिल्ली वाहतूक पोलिसांचे अतिरिक्त आयुक्त दिनेश कुमार गुप्ता यांनी सांगितले की आम्ही होळीच्या उत्सवावर लक्ष ठेवून होतो. तसेच आम्ही होळीच्या दिवशी ड्रिंक अँड ड्राईव्ह टेस्टिंग केले, ट्रिपल रायडिंगकडे लक्ष दिले आणि दुचाकींवर स्टंट करणाऱ्यांना फाइनही मारला.