फोटो सौजन्य: www.volkswagen.co.in
भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रातील वाढती उन्नती पाहता अनेक विदेशी ऑटो कंपन्या आपले वर्चस्व स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. यातीलच एक मोठे नाव म्हणजे फोक्सवॅगन.
Volkswagen ने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. ही कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार किफायतशीर कार कशी ऑफर करता येईल, याबाबत विचार करत असते. एकीकडे कंपनीच्या काही कारची विक्री जोरात सुरु असतानाच दुसरीकडे त्यांच्याच एका कारला चक्क ग्राहकच मिळत नाही आहे. नेमकी कोणती कार आहे ही? चला जाणून घेऊया.
होळीच्या धुंदीत ‘या’ राज्यातील लोकांनी Traffic Rules ला बसवले धाब्यावर, पोलिसांनी लावला हजारोंचा दंड
भारतीय बाजारपेठेत फोक्सवॅगनच्या अनेक कारला सातत्याने उत्तम प्रतिसाद मिळत आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2025 मध्ये फोक्सवॅगन व्हर्टसला 1,800 हून अधिक ग्राहक मिळाले. परंतु, याच काळात, कंपनीच्या अद्भुत एसयूव्ही Volkswagen Tiguan ला निराशा सहन करावी लागली आहे. याचे कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात फोक्सवॅगन टिगुआनला फक्त 2 खरेदीदार मिळाले आहे.
या कालावधीत, Tiguan च्या विक्रीत वार्षिक आधारावर 98 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तर अगदी 1 वर्षापूर्वी म्हणजे फेब्रुवारी 2024 मध्ये, टिगुआनला फक्त 102 ग्राहक मिळाले होते. चला, टिगुआनची फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमत याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जर आपण या कारच्या पॉवरट्रेनबद्दल बोललो तर, फोक्सवॅगन टिगुआनमध्ये ग्राहकांना 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन मिळते, जे 190bhp ची कमाल पॉवर आणि 320Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या एसयूव्हीचे इंजिन 7-स्पीड ड्युअल क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.
ग्राहकांना एसयूव्हीमध्ये 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्लायमेट कंट्रोल आणि 30 रंगांच्या अँबियंट लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय, सुरक्षिततेसाठी, एसयूव्हीमध्ये 6-एअरबॅग्ज, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आणि इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
Kia Syros Vs Mahindra XUV 3XO: फीचर्स, इंजिन आणि किमतीच्या बाबतीत कोणत्या एसयूव्हीचा पगडा भारी
भारतीय बाजारपेठेत फोक्सवॅगन टिगुआनची स्पर्धा स्कोडा कोडियाक, टोयोटा फॉर्च्युनर, एमजी ग्लोस्टर आणि ह्युंदाई टक्सन सारख्या कारशी आहे.
Volkswagen Tiguan या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 38.17 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलूही शकते.