फोटो सौजन्य: @M_KirloskarTata (X.com)
भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. यात 7 सीटर कार सेगमेंटमध्ये अनेक दमदार कार्स ऑफर केल्या जातात, ज्यांना ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देत आहे. यातीलच एक लोकप्रिय कार म्हणजे Toyota Innova. आजही जेव्हा आपल्या कुटुंबासाठी उत्तम कार निवडायची वेळ येते, तेव्हा ग्राहक हा इनोव्हाला पहिले प्राधान्य देत असतो. आता नुकतेच या कारचे टोयोटा इनोव्हा हायक्रॉसची एक्सक्लुझिव्ह व्हर्जन भारतात लाँच केले आहे. ही कार पूर्णपणे लोड केलेल्या ZX(O) हायब्रिड व्हेरियंटवर आधारित आहे. तसेच या कारची किंमत देखील कमी ठेवण्यात आली आहे. या कारची विक्री जुलै 2025 पासून सुरू होईल. Toyota Innova Hycross Exclusive Edition कोणत्या फीचर्ससह लाँच करण्यात आली आहे? त्याबद्दल जाणून घेऊया.
तापत्या उन्हात कारमधील वातावरण कूल करणारा AC किती टनचा असतो?
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशन फक्त दोन कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आली आहे, जे सुपर व्हाइट आणि पर्ल व्हाइट आहेत.
ऑल ब्लॅक रूफ
कॉन्ट्रास्टिक एलिमेंटसह ब्लॅक ग्रिल
18-इंच ब्लॅक अलॉय व्हील्स
बोनेटवर काळ्या रंगाची इनोव्हा लिहिले आहे
सिल्वर फ्रंट आणि रिअर फॉक्स स्किड प्लेट्स
बाहेरील रीअरव्ह्यू मिररवर (ORVM) क्रोम गार्निश
टेलगेटवर ‘एक्सक्लुझिव्ह’ बॅज
बूट लिडवर क्रोम गार्निश
यासोबतच, यात ड्युअल-टोन इंटिरिअरसह नवीन वायरलेस फोन चार्जर, फूटवेल लाइटिंग आणि एअर प्युरिफायर देण्यात आले आहे. हे सर्व इनोव्हा मॉडेल्सवर दिले जात नाही. यातील उर्वरित फीचर्स इनोव्हा हायक्रॉसच्या ZX(O) हायब्रिड व्हेरियंट सारखेच आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशनमध्ये 10.1 -इंच टचस्क्रीन, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, मागील व्हेंट्ससह ड्युअल-झोन ऑटो एसी, मेमरी आणि व्हेंटिलेशन फंक्शनसह 8-वे पॉवर्ड फ्रंट सीट्स आहेत. यात दुसऱ्या रांगेतील पॉवर्ड ऑटोमन सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ आणि 9-स्पीकर JBL साउंड सिस्टम देखील आहे.
परफॉर्मन्सच्या बाबतीत भल्याभल्यांना मागे सोडतील ‘या’ Powerful Bikes, किंमत 3 लाखांपेक्षा कमी
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, यात 6 एअरबॅग्ज, 60-डिग्री कॅमेरा, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ऑटो-डिमिंग इनसाइड रीअरव्ह्यू मिरर (IRVM) देण्यात आला आहे. यासोबतच, ADAS सूटमध्ये लेन कीप असिस्ट आणि अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सारखी सेफ्टी फीचर्स देखील देण्यात आली आहेत.
टोयोटा इनोव्हा हायक्रॉस एक्सक्लुझिव्ह एडिशन भारतात 32.58 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. हे ZX (O) हायब्रिड (किंमत 31.34 लाख रुपये) व्हेरियंटपेक्षा 1.24 लाख रुपयांनी स्वस्त आहे. भारतात, ही कार Kia Carens, Maruti XL6, Maruti Ertiga आणि Toyota Rumion सोबत स्पर्धा करेल.