HSRP Number Plate अजून नाही बसवलीत? 'या' तारखेनंतर नंबर प्लेट लावल्यास भरावा लागेल दंड
राज्यात वाहनाच्या चोरीला आला बसावा म्हणून राज्य सरकारने सगळ्या वाहनांना HSRP Number Plate बसवणे अनिवार्य केले आहे. हा निर्णय लागू झाल्यानंतर,अनेक वाहन चालकांची धांदल उडाली होती. नागरिकांची हीच धांदल कमी करण्यासाठी सरकारने HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम तारीख पुन्हा वाढवली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व प्रकारच्या जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच High Security Registration Plate बसविणे बंधनकारक केले आहे. याअंतर्गत पूर्वी ३० जून २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, या कालावधीत अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद न मिळाल्याने परिवहन विभागाने ही अंतिम मुदत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सह परिवहन आयुक्त (संगणक) शैलेश कामत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पॉवरफुल लूकसह 2025 Bajaj Dominar 250 आणि Dominar 400 लाँच, यंदा किंमत थोडी वाढली
शासनाच्या निर्देशानुसार, HSRP पाटी बसविणे ही वाहनधारकांसाठी कायदेशीर जबाबदारी असून ती वेळेत पूर्ण करणे अनिवार्य आहे. या नवीन मुदतीनुसार, सर्व वाहनधारकांनी लवकरात लवकर आपल्या वाहनासाठी HSRP बसवून घ्यावे. यासाठी वाहनधारकांना परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर [http://transport.maharashtra.gov.in](http://transport.maharashtra.gov.in) जाऊन वेळ नोंदवावी लागेल. जर ही वेळ १५ ऑगस्ट २०२५ पूर्वी नोंदवण्यात आली असेल, तर अशा वाहनांवर कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना विभागाने दिली आहे.
HSRP नंबर प्लेट या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहनांची ओळख अधिक पारदर्शक करण्यासाठी उपयुक्त ठरतात. या नंबर प्लेटमध्ये विशिष्ट कोड, आणि होलोग्राम असतो, जे चोरी, फसवणूक आणि गुन्हेगारी घटनांपासून तुमच्या वाहनांना संरक्षण देतात. त्यामुळे ही नंबर प्लेट बसविणे केवळ कायदेशीर बाब नाही, तर ती वाहन आणि वाहनधारकाच्या सुरक्षेसाठीही अत्यंत आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये Mahindra चा धमाका ! ‘ही’ पॉवरफुल SUV झाली लाँच, जाणून घ्या किंमत?
परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, १५ ऑगस्ट २०२५ नंतरही जर कोणत्याही वाहनावर HSRP पाटी आढळली नाही, आणि अशा वाहनांची तपासणी करण्यात आली, तर संबंधित वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामध्ये आर्थिक दंड, वाहन जप्ती किंवा वाहन परवाना रद्द करणे यांसारख्या शिक्षांचा समावेश असू शकतो.
या पार्श्वभूमीवर, सह परिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी राज्यातील सर्व वाहनधारकांना वेळेत कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, “ही मुदत ही अंतिम आहे. वाहनधारकांनी ती गांभीर्याने घेतली पाहिजे. शासनाची ही कारवाई जनहित आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आहे.”