फोटो सौजन्य: Social Media
देशात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच वाढती मागणी लक्षात घेऊन अनेक कार उत्पदक कंपन्या आता इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करताना दिसत आहे. पण आजचा ग्राहक फक्त आधुनिकतेला नाही तर सुरक्षिततेलाही प्राधान्य देत आहे. म्हणूनच तर अनेक कंपन्या आपल्या कारचे क्रॅश टेस्ट देखील करताना दिसतात. नुकतेच महिंद्राने सुद्धा आपल्या इलेक्ट्रिक कारचे क्रॅश टेस्टिंग केले आहे.
महिंद्रा अँड महिंद्राने अलीकडेच त्यांच्या दोन इलेक्ट्रिक एसयूव्ही BE6 आणि XEV 9e लाँच केल्या. महिंद्राच्या या दोन्ही कार त्याच्या लाँचिंगपासूनच चर्चेत आहेत. आता मोठी गोष्ट अशी आहे की या दोन्ही वाहनांना अॅडल्ट प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये आणि मुलांच्या सुरक्षिततेमध्ये सर्वाधिक गुण मिळवले आहेत.
2024 मधील अशा कार ज्यांच्याकडे ग्राहकांनी ढुंकूनही पाहिले नाही, 2025 मध्ये कसा असेल परफॉर्मन्स?
महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक एसयूव्हीना भारत एनसीएपी क्रॅश टेस्टमध्ये ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. यासह, महिंद्रा XEV 9e आणि BE6 ही भारतातील सर्वात सुरक्षित इलेक्ट्रिक कार बनल्या आहेत.
महिंद्रा XEV 9e ने अॅडल्ट प्रवाशांच्या सुरक्षिततेमध्ये 32 पैकी 32 गुण मिळवले आहेत. याशिवाय, BE 6 ला 32 पैकी 31.93 गुण मिळाले. मुलांच्या सुरक्षिततेमध्ये दोन्ही कारना ४९ पैकी ४५ गुण मिळाले आहेत.
भारत एनसीएपी हा एक असेसमेंट प्रोग्राम आहे जो वाहनांच्या सुरक्षिततेचे मूल्यांकन करतो. अपघात झाल्यास कारमध्ये बसलेल्या लोकांना किती दुखापत होऊ शकते हे यावरून दिसून येते. जेव्हा एखाद्या कारला ५-स्टार रेटिंग मिळते, तेव्हा ती कार सुरक्षिततेच्या दृष्टीने चांगली मानली जाते.
आता पार्किंग नाही तर कार नाही ! महाराष्ट्रात लवकरच लागू होणार ‘हा’ नियम?
महिंद्रा XEV 9E ही एक मोठी इलेक्ट्रिक कार आहे आणि BE 6e ही एक कॉम्पॅक्ट SUV आहे. या वाहनांमध्ये 59 किलोवॅट प्रति तास आणि 79 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक उपलब्ध आहेत. या वाहनांच्या रेंजबद्दल बोलायचे झाले तर, BE 6e एका चार्जिंगमध्ये 682 किमीची रेंज देण्याचा दावा करते. मोठी इलेक्ट्रिक कार XEV 9E एका चार्जवर 656 किलोमीटर अंतर कापण्याचा दावा करते.
महिंद्राच्या या दोन्ही इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जलद चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. यासोबतच, OTA अपडेट्स, सेल्फी कॅमेरा, ADAS लेव्हल २, १६-स्पीकर साउंड सिस्टम आणि हेड-अप डिस्प्ले सारख्या फीचर्स देखील समावेश आहे. त्यामुळेच या कार लाँच होताच त्यांच्या बुकिंगसाठी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही कारचे लूक देखील इतके आकर्षक आहे की दिसताच क्षणी या कार मन जिंकेल.