फोटो सौजन्य: Social Media
देशात अनेक मोठ्या आणि विश्वासाच्या कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बेस्ट कार्स ऑफर करत असतात. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे मारुती सुझुकी. मारुती सुझुकीने भारतीय ग्राहकांसाठी अनेक उत्तम कार उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यातही वॅगन आर सारख्या कार्स विक्रीच्या बाबतीत इतर कंपन्यांच्या कार्सना मागे टाकत आहे. पण आता कंपनी आपली एक कार येत्या 1 एप्रिल 2025 पासून बंद करणार आहे.
देशातील सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी मारुती सुझुकीने त्यांची लोकप्रिय सेडान Ciaz, एप्रिल 2025 पासून कायमचे बंद होऊ शकते. मारुती सुझुकी सियाझची विक्री सतत कमी होत आहे. अनेक माध्यमांच्या वृत्तानुसार, मारुती सुझुकीने मार्चपासून सियाझचे उत्पादन थांबवले आहे. तर या कारची विक्री एप्रिल 2025 पासून थांबणार आहे. म्हणजेच ही कार बंद होण्यासाठी फक्त 1 दिवस शिल्लक आहे. चला, या मारुती सुझुकी सियाझच्या विक्री, फीचर्स, पॉवरट्रेन आणि किंमतींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
जर आपण मारुती सियाजच्या विक्रीबद्दल बोललो तर, आर्थिक वर्ष 2022 मध्ये, मारुती सुझुकी सियाझला एकूण 15,869 ग्राहक मिळाले. तर आर्थिक वर्ष 2023 मध्ये ही विक्री फक्त 13,610 युनिट्सपर्यंत कमी झाली होती. यानंतर, आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आणखी घट झाली आणि मारुती सियाझला फक्त 10,337 ग्राहक मिळाले. भारतीय बाजारपेठेत एसयूव्हीच्या वाढत्या मागणीचा परिणाम सियाझसह अनेक सेडान कारवरही झाला आहे.
Nissan Motor India लवकरच भारतात 5 सीटर सी-एसयूव्ही आणि ऑल न्यू 7 सीटर बी-एमपीव्ही आणणार
दुसरीकडे, सियाझमध्ये एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्पसह एलईडी डीआरएलएस, एलईडी टेललॅम्प आणि 16-इंच अलॉय व्हील्स आहेत. तर कारमध्ये 7 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टीफंक्शन स्टिअरिंग व्हील आणि क्रूझ कंट्रोल सारखी बेसिक फीचर्स देण्यात आली आहेत.
पॉवरट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, मारुती सियाझमध्ये 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे 105bhp ची कमाल पॉवर आणि 138Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. बाजारात मारुती सियाझची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत टॉप मॉडेलसाठी 9.41 लाख रुपयांपासून 12.29 लाख रुपयांपर्यंत आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते. मारुती सियाझची स्पर्धा होंडा सिटी आणि ह्युंदाई व्हर्ना सारख्या सेडान कारशी आहे.