फोटो सौजन्य: @carandbike (X.com)
देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. भारतीय सरकार देखील EV विक्रीला आपला पाठिंबा दर्शवत आहे. ज्यामुळे आगामी काळात नक्कीच भारतीय रस्त्यांवर EV धावताना दिसतील यात काही वाद नाही. पण आजही इलेक्ट्रिक कार्सची किंमत ही सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळेच तर अनेक ग्राहक इंधनावर चालणाऱ्या कार्सपेक्षा CNG कार्सला जास्त प्राधान्य देत असतात.
देशात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट सीएनजी कार्स ऑफर करत असतात. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे मारुती सुझुकी. मारुती ही देशातील सर्वात मोठी सीएनजी कार विकणारी कंपनी आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण 17 मॉडेल्सचा समावेश आहे. यापैकी, 12 हून अधिक कारमध्ये सीएनजीचा पर्याय आहे. यामुळेच 2025 च्या आर्थिक वर्षात देशभरातील ग्राहकांनी या कार्स खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. खरंतर, 2025 च्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकीने देशांतर्गत बाजारात एकूण 1,795,259 पासनेजर व्हेईकल विकले आहे. या एकूण विक्रीपैकी, मारुतीची सीएनजी कार्सची विक्री सुमारे 6.20 लाख युनिट्स होती. याचा अर्थ गेल्या वर्षी विकल्या गेलेल्या प्रत्येक तीन कारपैकी एक सीएनजी कार होती. कंपनीने वार्षिक आधारावर सीएनजी वाहन विक्रीत 28 टक्क्यांची वाढ साध्य केली आहे.
अखेर वेळ आलीच ! मार्केटमध्ये Maruti Suzuki ची पहिली EV होणार लाँच, 500 km ची मिळणार रेंज
मारुती सुझुकीकडे देशातील सर्वात मोठा सीएनजी पोर्टफोलिओ आहे, ज्यामध्ये 13 कार्स आहेत. जिमनी, इग्निस आणि इन्व्हिक्टो या तीन कार वगळता, सर्व मारुती कार आणि एसयूव्ही फॅक्टरी फिटेड सीएनजी किटसह उपलब्ध आहेत.
2024 च्या अखेरीस, मारुती सुझुकीचा सीएनजी सेगमेंटमध्ये 71.60% बाजार हिस्सा होता, त्यानंतर टाटा मोटर्सचा 16.13% आणि ह्युंदाईचा 10.04% वाटा होता. मारुतीसोबतच्या पार्टनरशिपमुळे टोयोटाचा सीएनजी क्षेत्रातही 2.21% बाजार हिस्सा आहे.
आता देशातील नंबर 1 कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उडणार झुंबड, कंपनी देतेय ‘एवढी’ भली मोठी सूट !
मारुतीच्या सीएनजी कार्सचे मायलेज खूपच दमदार आहे. सेलेरियोच्या सीएनजी व्हेरियंटचे मायलेज प्रति किलो 35 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. आर्थिक वर्ष 2025 च्या सेल्स रिपोर्ट्समध्ये, कंपनीने असेही उघड केले की त्यांनी 20,672 वाहनांची विक्री केली, जी आर्थिक वर्ष 2025 मधील तिच्या एकूण विक्रीच्या 2.4% आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या तुलनेत ही वाढ 27% आहे. ही वाढ फक्त दोन मॉडेल्समधून येते, ग्रँड विटारा आणि इन्व्हिक्टो, जे 1.5-लिटर स्ट्राँग-हायब्रिड पॉवरट्रेनसह ऑफर केले जातात.